Mahadev Jankar : महादेव जानकर, आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या जावयाला 15 कोटींचा गंडा; चौघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

fraud property deal case : मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारात महादेव जानकर, आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या जावयालाच पंधरा कोटींचा गंडा घातल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
fraud property deal case; Mahadev jankar, Ratnakar gutte
fraud property deal case; Mahadev jankar, Ratnakar guttesarkarnama
Published on
Updated on

Fraud News : मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारात 15 कोटी घेऊनही खरेदी खत व फेरफार न करून देता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर तसेच गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजेभाऊ फड यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई येथील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कोळखे येथील प्रॉपर्टी विक्रीच्या नावाखाली तब्बल 14 कोटी 49 लाख 85 हजार 975 रुपये घेऊनही खरेदी खत व फेरफार न करता विश्वासघात केला. या प्रकरणात तालुक्याच्या चौघाजणांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई येथील 'टोटल लॉजिस्टीक (इंडिया) प्रा.लि.' या कंपनीच्या मालकीची कोळखे ता. पनवेल शिवारात गट क्रमांक 81, 82 व 83 मध्ये असलेली मालमत्ता विक्रीचा व्यवहार करण्यात आला होता. या व्यवहारापोटी राजेभाऊ फड यांच्याकडून प्रवीण गुप्ता व त्यांच्या कुटुंबाने रोख व आरटीजीएसच्या माध्यमातून 14 कोटी 49 लाख 85 हजार 975 रुपये स्वीकारले. या संदर्भात मुंबई येथे महादेव जानकर यांच्या घरी या सगळ्या व्यवहाराची बोलणी झाली होती असे राजेभाऊ फड यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

fraud property deal case; Mahadev jankar, Ratnakar gutte
Mahadev Jankar : अंगणातच घोंगडी अंथरली, बनियानवरच झोपले : महाराष्ट्राच्या माजी मंत्र्यांचा मेंढपाळांच्या वाड्यावर मुक्काम

एकूण 15 कोटी रुपयांचा व्यवहार ठरवून साडेचौदा कोटी रुपये स्वीकारल्यानंतर गुप्ता कुटुंबियांना राजेभाऊ फड यांनी खरेदी खत करून देण्याबाबत विचारणा केली. त्यावेळी प्रवीण गुप्ता, मंजू गुप्ता यांनी त्यांना दमदाटी केली.

फोनवर परत कॉल केला किंवा माझ्याकडे आलास तर तुला सोडणार नाही. तुझा जीव प्यारा असेल तर माझ्या नादी लागू नकोस. आपला व्यवहार विसरून जा अन्यथा तुझा खून होईल,अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

fraud property deal case; Mahadev jankar, Ratnakar gutte
Mahadev Jankar : माजी मंत्री महादेव जानकर काय करून बसले; होतेय चर्चा! कारवाई होणार का?

या प्रकरणी राजेभाऊ श्रीराम फड यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रवीण गुप्ता, मंजू गुप्ता, अंकित गुप्ता, संजना गुप्ता यांच्या विरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com