Mahadev Jankar: राहुल गांधीच्या घरी पाहुणचार, ठाकरे बंंधूच्या मेळाव्यात हजेरी; आता तेच जानकर शरद पवारांसाठी मैदानात...

Mahadev Jankar Political News: भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत,वंचितचे प्रकाश आंबेडकर यांसह अनेक नेतेमंडळींकडून शरद पवारांना निशाणा साधला जात आहे. याचदरम्यान,रासपचे महादेव जानकर हे त्यांच्यासाठी मैदानात उतरले आहे. शरद पवारांचं ओबीसींच्या आरक्षणात मोठं योगदान असल्याचंही सांगत त्यांनी विरोधकांना चांगलंच ठणकावलं आहे.
Sharad pawar mahadev jankar
Sharad pawar mahadev jankar sarkarnama
Published on
Updated on

Jalna News : राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी महायुतीमधून बाहेर पडत वेगळी चूल मांडण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांनी आता थेट काँग्रेस,महाविकास आघाडी, इंडिया आघाडीशी जवळीक साधण्यास सुरूवात केली आहे. भाजपसोबत युती ही आपल्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती असं विधान केलेल्या महादेव जानकरांनी (Mahadev Jankar) आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांसाठी किल्ला लढवला आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी शरद पवार यांना ठरवून टार्गेट करणाऱ्या ओबीसी नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जालन्यात दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मंडल यात्रेत जानकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी जानकरांनी ओबीसींच्या हिताचे प्रश्न घेऊन ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मंडल यात्रा जात असल्याचंही म्हटलं. म्हणून स्वत: आपण या मंडल यात्रेचे स्वागत करण्यासाठी मी स्वतः हजर झालो असल्याचं जानकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

महादेव जानकर यांनी जालन्यात बुधवारी (ता.20) माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ओबीसींच्या हिताचा निर्णय घ्यायचं काम शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे.आंब्याच्याच झाडाला माणसं दगड मारतात,ज्याला फळ नसतं त्याला कोणी दगड मारत नाही,असा टोलाही जानकरांनी शरद पवारांवर टीका करणाऱ्या ओबीसी नेत्यांना लगावला आहे.

Sharad pawar mahadev jankar
Best Election: ठाकरे बंधूंचा पराभव, शशांक राव यांचा विजय... मग भाजपा एवढा खूश का? हाती काय लागलं?

महादेव जानकर हे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी करत असून त्यांनी सध्या महायुतीच्या विरोधकांशी हातमिळवणी करण्याच्या उद्देशानं काँग्रेससह महाविकास आघाडीसोबत येण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत,वंचितचे प्रकाश आंबेडकर यांसह अनेक नेतेमंडळींकडून शरद पवारांना निशाणा साधला जात आहे. याचदरम्यान,रासपचे महादेव जानकर हे त्यांच्यासाठी मैदानात उतरले आहे. शरद पवारांचं ओबीसींच्या आरक्षणात मोठं योगदान असल्याचंही सांगत त्यांनी विरोधकांना चांगलंच ठणकावलं आहे.

Sharad pawar mahadev jankar
Rohit Pawar : शिरसाटांचा घोटाळा? मोर्चा काढणाऱ्यांना फडणवीसांनी फटकारताच रोहित पवारांनी केली 'ही' मागणी; म्हणाले, 'आपण अभ्यासू...'

महादेव जानकर यांनी महायुतीमधून बाहेर पडल्यानंतर मे महिन्यात झालेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं निमंत्रण राहुल गांधींना त्यांच्या घरी जाऊन दिले होते. यावेळी राहुल गांधींच्या स्वागतानं आणि पाहुणचारानं जानकर भारावले होते.

विधानसभा निवडणुकीत भाजपशी फारकत घेत जानकरांचा पक्ष स्वबळावर लढला होता. 100 पेक्षा अधिक जागांवर लढलेल्या जानकर आणि त्यांच्या उमेदवारांचा महायुतीच्या त्सुनामीसमोर निभाव लागला नव्हता. जानकर यांनी त्यानंतर भाजपवर उघड टीका करताना हा पक्ष आपल्या मित्रपक्षांना संपवतो. आता त्यांना आमची गरज राहिली नसल्याचंही म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com