Suresh Dhas News : बारा गुंठ्यासाठी महादेव मुंडेंना मारले! न्याय मिळत नसेल तर ज्ञानेश्वरी ताईंनी काय करावे ?

Mahadev Munde, a poor man, was allegedly killed over a small land piece. : वाल्मीक कराडच्या सुनावणीला मकोका लागलेला आरोपी कोर्टात हजर राहतो, यावरून पोलीस या प्रकरणात किती गंभीर आहे हे दिसून येते.
Suresh Dhas-Dnyaneshwari Munde News
Suresh Dhas-Dnyaneshwari Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed Crime News : महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या कुटुंबाला न्याय मिळत नाही म्हणून काल टोकाचं पाऊल उचललं. आधी पेट्रोलच्या बाटल्या सोबत आणून आत्मदहनाचा प्रयत्न होता, पण पोलीसांनी त्या जप्त केल्या. त्यानंतर एसपी कार्यालयातच विष प्राशन करत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी स्वतःला संपवून घेण्याचा प्रयत्न केला. यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी विधान भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. फक्त बारा गुंठे जमीनीसाठी महादेव मुंडे यांची हत्या वाल्मीक कराडच्या गुंडानी केली, तो गरीब माणूस होता, असे धस म्हणाले.

या प्रकरणातील आरोपी गोट्या गित्ते हा सायको किलर आहे, उद्या तो आम्हालाही मारू शकतो, अशी भिती काही दिवसापुर्वी बाळा बांगर यांनी व्यक्त केली होती. एकेकाळी वाल्मीक कराडचा जुना सहकारी असलेल्या विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन परळीतील महादेव मुंडे यांची हत्या करणारे आरोपी आपल्याला माहित असल्याचा दावा केला होता. वाल्मीक कराड (Walmik Karad) यांच्या सांगण्यावरूनच ही हत्या झाली होती.

काम फत्ते झाल्याचा पुरावा म्हणून महादेव मुंडे याच्या शरीरातील मासाचा तुकडा, कातडं आणि रक्त टेबलवर ठेवण्यात आले होते. (Beed News) बक्षीस म्हणून आरोपींना वाल्मीक कराडने गाड्या दिल्या होत्या, असा खळबळजनक आरोप बांगर यांनी केला होता. बांगर यांनी आरोपी आपल्या माहित असल्याचे सांगितल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधिक्षक नवीनत कावँत यांच्याकडे निवदेन देऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

Suresh Dhas-Dnyaneshwari Munde News
Mahadev Munde Case : महादेव मुंडेंचे खूनी अजूनही मोकाट, कुटुंबियांचा सयंम संपला; आत्मदहनाचा प्रयत्न, विषही प्राशन केले!

तसेच बाळा बांगर यांचा जबाब नोंदवून घ्या, तसेच तातडीने आरोपींना बेड्या ठोका, अशी आग्रही मागणी त्यांची होती. परंतु वाल्मीक कराडच्या सुनावणीला मकोका लागलेला आरोपी कोर्टात हजर राहतो, यावरून पोलीस या प्रकरणात किती गंभीर आहे हे दिसून येते. त्यामुळे ज्ञानेश्वरी ताईंना दुसरा पर्याय उरला नाही आणि यातूनच त्यांनी विष प्राशन केले, असे (Suresh Dhas) धस म्हणाले. महादेव मुंडेला फक्त 12 गुंठ्यासाठी मारलं, तो गरीब माणूस होता. गोट्या गिते हा सायको किलर आहे.

Suresh Dhas-Dnyaneshwari Munde News
Suresh Dhas On Sandip Kshirsagar : आरोपींसोबतच्या फोटोवरून एखाद्याचे नाव घेणे चुकीचे! सुरेश धस यांच्याकडून संदीप क्षीरसागर यांची पाठराखण

महादेव मुंडेंच्या प्रकरणात आता माहिती येत आहे. त्यात गोट्या गीते, राजू फड, वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा या सर्वांची नावे बाळा बांगर जो आकाबरोबर असायचा त्याने मिडिया समोर हे सांगितलेले आहे. मी जेव्हा आकाला भेटायला गेलो, तेव्हा एक माणसाचं चमडं, हाडं आणि त्याचे रक्तही यांच्या ऑफिसच्या टेबलवर होते, हे बाळा बांगर बोललेत. यानंतर त्यांनी तक्रार दिली. त्या ज्ञानेश्वरी ताईंना एसपी कार्यालयासमोर औषध प्यायची वेळ आली. मग त्यात त्या ताईंची काय चूक आहे? असा सवालही सुरेश धस यांनी केला.

Suresh Dhas-Dnyaneshwari Munde News
Walmik Karad: वाल्मिकला मराठवाडा ताब्यात घ्यायचा होता! जवळच्या सहकाऱ्याचे खळबळजनक आरोप; नेमकं काय घडलंय?

काही दिवसांपूर्वी झालेल्या एका तारखेवेळी आकाच्या ग्रुपमधील एक मोक्का असलेला आरोपी कोर्टात येतो. बीडचे पोलीस नक्की काय कारवाई करतात. ज्ञानेश्वरी मुंडे या ताईने प्रत्येकवेळी पोलिसात जाऊन माझ्या नवऱ्याचं काय झालं, असे विचारले. 21 ऑक्टोबर 2023 पासून ती माऊली आणि तिचा भाऊ हे दोघंच लढतात. काल त्या ताईने विष प्राशन केल्यानंतर आता पुढे तपास दिला आहे. त्यानंतर आता सांगतात की गोट्या गितेला पकडण्यासाठी पुण्याला टीम पाठवली आहे. ज्या दिवशी बाळा बांगरेने स्टेटमेंट केलं, त्या दिवशीपासून ते फरार झाले. ते आरोपी पोलिसांनी का उचलले नाही?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com