12 MLC Maharashtra Case: मोदींची हायकोर्टात याचिका; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या सुनावणीला...

Shiv Sena Thackeray Group: शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांचा हायकोर्टात अर्ज
Shiv Sena Thackeray Group
Shiv Sena Thackeray GroupSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्ती संदर्भातील सुनावणीसाठी वेळ द्यावा, अशी विनंती शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी हायकोर्टात केली आहे. या प्रकरणाची सुनावणी सलग तिसऱ्यावेळीही वेळेअभावी होऊ न शकल्याने सुनील मोदी यांनी हायकोर्टात अर्ज सादर केला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र, तत्कालीन राज्यपालांनी याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. जवळपास गेल्या तीन वर्षांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण रखडलेलेच आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shiv Sena Thackeray Group
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात होणार राजकीय उलथापालथ? भाजपने खेळला मोठा डाव; शिंदे गट, अजित पवार गट पुरते अडकले?

राज्यात सत्तेत बदल झाल्यावर अर्थात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीने राज्यपालांकडे दिलेल्या 12 सदस्यांची यादी मागे घेण्याचा निर्णय घेतला. तसचे शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा नवीन यादी सादर करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, यावर ठाकरे गटाच्यावतीने एक याचिका दाखल करण्यात आली होती. राज्यपालांची ही कृती नियमांमध्ये बसत नसल्याचं सांगत त्यावर आक्षेप घेण्यात आला होता.

राज्यपालांचा हा निर्णय बेकायदा असून महाविकास आघाडीने दिलेल्या यादीनुसार आमदारांची नियुक्ती करावी, अन्यथा ही यादी मागे घ्यायची असल्यास त्याची सविस्तर कारणे देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी याचिकेद्वारे हायकोर्टात केली होती. त्यानंतर त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. मात्र, तेव्हापासून या प्रकरणाच्या पुढील सुनावणीला कोर्टात अनेकदा तारीख पे तारीख मिळाली.

आता राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीच्या प्रकरणासंदर्भात सुनावणीसाठी वेळ द्यावा, यासाठी विनंती याचिका सुनील मोदी यांनी हायकोर्टात दाखल केी आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी कधी होते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Shiv Sena Thackeray Group
Sanjay Raut News: भाजपनं देशाच्या सुरक्षेचा खेळखंडोबा केला; राऊत कडाडले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com