Ashok Chavan : '24 तासही झाले नाही तोच बोंबाबोंब सुरू', भाजपच्या बड्या नेत्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

Ashok Chavan Viral Audio Clip Over Nanded Drought : दुष्काळी परिस्थितीच्या यादीतून मुदखेड, मुखेड हे तालुके वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसेच माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेते अशोक चव्हाण यांनी देखील यावरून नाराजी व्यक्त केली होती.
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nanded News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. ज्यात मराठवाड्यातील 76 पैकी 74 तालुके आहेत. मात्र नांदेड जिल्ह्यातील दोन तालुके वगळले आहेत. यावरून माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेते खासदार अशोक चव्हाण यांनी याआधीच नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान अशोक चव्हाण आणि एका कार्यकर्त्याच्या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे नांदेडसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ज्यात ते कार्यकर्त्याला दोन दिवस शांत राहण्यासह शिव्या खाण्याचा सल्ला देताना दिसत आहे.

महाराष्ट्रातला 75 टक्के भाग हा दुष्काळाच्या छायेत असून पावसाभावी शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यावरून राज्य सरकराने अखेर दुष्काळ जाहीर करत तब्बल 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. पण नांदेड जिल्ह्यातून मुदखेड आणि मुखेड हे दोन तालुक्यांना दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. यावरून शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे देखील कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असून चव्हाण आणि त्यांच्या एका कार्यकर्त्याची कथित संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. याबाबत साम टीव्हीवर वृत्त आले असून सरकारनामा पुष्टी याची करत नाही.

Ashok Chavan
Ashok Chavan : नांदेड जिल्ह्यातील दोन तालुके वगळल्याने अशोक चव्हाण नाराज, पाठपुरावा सुरू!

या ऑडिओ क्लीपमध्ये मुदखेड तालुका दुष्काळाच्या यादीमधून वगळण्यात आल्याने या कार्यकर्त्याने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच थेट अशोक चव्हाण यांनाच हा कार्यकर्ता जाब विचारताना दिसत आहे. त्या कार्यकर्त्याने लोकं आता आम्हाला शिव्या घालत आहेत. तालुका का वगळा? आता तोंड लपवायला लागतं आहे. तुम्हाला कळतं पण आम्हाला नाही. आता लोकांना उत्तरं काय द्यायची असा सवाल केला. यावर अशोक चव्हाण यांनी 24 तास ही झाले नाही तोच बोंबाबोंब सुरू. आता दोन दिवस शांत रहा आणि लोकांच्या शिव्या खा असा सल्ला दिल्याचं या ऑडिओ क्लिप मध्ये ऐकायला मिळत आहे.

तसेच संतापलेल्या कार्यकर्त्याला शांत करत अशोक चव्हाण यांनी सरकारची बाजू मांडताना शासनाने काही केलच नाही का? काळजी करू नका. मुदखेड तालुका 100% दुष्काळ यादीत येईल, तुम्ही काळजी करू नका, असा धीर दिला आहे.

यावर पुन्हा त्या कार्यकर्त्याने आम्ही जुने कार्यकर्ते आहोत. लोक प्रश्न विचारत आहेत. आता आम्हाला तोंड काढायला जागा नाही कुठं. जागो जागी लोकं शिव्या देत आहेत. तालुका का वगळला असा सवाल करत असल्याचे सांगितले. ज्यावर अशोक चव्हाण यांनी थोडं थांब, थांबा ना एव्हढी घाई काय लागलीय असा सवाल केला. ज्यावर साहेब याच रिजन तर द्यावं लागलं ना असेही म्हटलं आहे.

Ashok Chavan
Ashok Chavan News : खासदार संजय राऊत यांच्या टीकेला अशोक चव्हाण यांच्याकडून जशास तसे उत्तर; म्हणाले, 'त्यांची ही शेवटची तडफड'

ज्यानंतर अशोक चव्हाण यांनी कारण द्यायची काय गरज आहे त्यांना, असा उटल सवाल करताच पुन्हा त्या कार्यकर्त्याने अख्या महाराष्ट्रातले एवढे तालुके घेतले मात्र आपले दोन तालुके कशामुळे वगळले याचे उत्तर हवं असल्याचे म्हटलं आहे. यावर अशोक चव्हाण यांनी विश्वास तर ठेवा. तुमचंच काहीतरी बोलत राहता. 24 तास झाले नाहीत बोंबा बोंब. थांबा जारा शांत रहा शिव्या खा. काही हरकत नाही, असे म्हणत फोन ठेवल्याचे समोर येत आहे. दरम्यान या दरम्यान या ऑडिओ क्लिपची सरकारनामा पुष्टी करत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com