Phulambri Local Body Election Result : शिवसेनेचा पराभूत उमेदवार म्हणतो, माझा पराभव जादूटोण्यामुळे!

Political News : फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 20 डिसेंबरला मतमोजणी पार पडली. मात्र, मतदानापूर्वीच दोन दिवस आधी प्रभाग क्रमांक 9 मधील भारत माता मतदान केंद्राच्या समोर कथित जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती
shivsena
shivsenasarkarnama
Published on
Updated on

नवनाथ इधाटे

Phulambri News : नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. पण या पराभवाला मतदान केंद्राबाहेर करण्यात आलेला जादूटोण्याचा प्रकार जबाबदार असल्याची अजब तक्रार आता या उमेदवाराने पोलीसात केली आहे. तसेच कथित जादूटोणा प्रकरणी तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या पराभूत उमेदवाराने केली आहे.

फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 20 डिसेंबरला मतमोजणी पार पडली. मात्र, मतदानापूर्वीच दोन दिवस आधी प्रभाग क्रमांक 9 मधील भारत माता मतदान केंद्राच्या समोर कथित जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा थेट परिणाम निवडणूक निकालावर झाला असून, जादूटोण्यामुळेच आपला पराभव झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (Shivsena) पक्षाचे प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार अमित वाहुळ यांनी केला आहे.

shivsena
BJP Politics : ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी मुंबईत भाजपची मोठी खेळी, तब्बल येवढ्या जागांवर उत्तर भारतीयांना तिकीट

त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देखील दिली आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर मतदान केंद्राच्या समोर जादूटोण्याशी संबंधित साहित्य आढळून आल्याची चर्चा परिसरात पसरली होती. या प्रकारामुळे अनेक मतदार भयभीत झाले, भीतीपोटी मतदारांनी मतदान करण्याचा निर्णय बदलल्याचा दावा शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार अमित वाहुळ यांनी केला आहे.

shivsena
Congress ticket controversy : धर्म आडवा आला, हिंदू असल्याने उमेदवारी नाकारली; मुलाच्या उमेदवारीसाठी लढणारा माजी खासदार काँग्रेसवर संतापला!

निवडणूक ही लोकशाहीची पवित्र प्रक्रिया असताना, अशा प्रकारे अंधश्रद्धेचा वापर करून मतदारांवर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले. अमित वाहुळ यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारच्या घटना घडणे हे लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

shivsena
Eknath Shinde Shiv sena : हट्टी मुलांचं लगेच ऐकलं जातं..! शिंदेंनी तिकीट नाकारलेल्या खासदार म्हस्केंच्या लेकाची खदखद आली बाहेर...

पोलिस प्रशासन नेमकी या प्रकरणात काय भूमिका घेते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. निवडणूक प्रक्रियेत अंधश्रद्धा व भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जावी, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधूनही उमटत आहेत. या प्रकरणामुळे फुलंब्रीतील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. विशेष म्हणजे फुलंब्री नगर पालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे राजेंद्र ठोंबरे हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत, तर याच पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक या ठिकाणी विजयी झाले आहेत.

shivsena
Ajit Pawar NCP : 'ते आमचे उमेदवारच नव्हेत..' गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याच्या आरोपांवर अजित पवारांचं भलतंच स्पष्टीकरण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com