MPSC Exam Protest: राज्यभर आंदोलनाचा भडका, पुण्यानंतर 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगरमध्येही संताप

MPSC Paper Leak Controversy: एमपीएससीच्या विविध परीक्षांमध्ये गैरप्रकार, निकालातील विसंगती आणि परीक्षाप्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या संशयामुळे राज्यभर आंदोलनाचा भडका उडाला आहे. सोमवारी (ता. ७) पुण्यात झालेल्या आंदोलना पाठोपाठ मंगळवारी छत्रपती संभाजीनगरात आंदोलन झाले.
Chhatrapati Sambhajinagar Student Protest .jpg
Chhatrapati Sambhajinagar Student Protest .jpgSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (एमपीएससी) कथित पेपरफुटी, गैरप्रकार आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. ८) क्रांती चौकात जोरदार निदर्शने केली. दोन तास हे आंदोलन चालले.

एमपीएससीच्या विविध परीक्षांमध्ये गैरप्रकार, निकालातील विसंगती आणि परीक्षाप्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या संशयामुळे राज्यभर आंदोलनाचा भडका उडाला आहे. सोमवारी (ता. ७) पुण्यात झालेल्या आंदोलना पाठोपाठ मंगळवारी छत्रपती संभाजीनगरात आंदोलन झाले. प्रा. उत्तम गोरे, शंकर शिंदे, बाळासाहेब शिंदे, यादवराव मारकड यांच्या नेतृत्वाखाली हे विद्यार्थी एकवटले होते.

एमपीएससीच्या कारभारावर ताशेरे ओढणारे विविध फलक हातात घेऊन या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. एमपीएससी अध्यक्ष व सचिव यांचे राजीनामे घ्या, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली. मराठवाड्याच्या विविध भागांतून स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शेकडो तरुण-तरुणी छत्रपती संभाजीनगरात राहून मेहनत घेतात.

पेपरफुटी, गैरव्यवहार, अनियमितता यामुळे प्रामाणिकपणे मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो व त्यांना संधी नाकारली जाते, असा आरोप करीत या विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. दोन तास चाललेल्या या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले होते.

Chhatrapati Sambhajinagar Student Protest .jpg
Sambhaji Bhide News: विद्यानंद बापटांनी मुद्दा पेटवला, ठाकरे बंधूंनी पाठिंबा दर्शवला, 'DJ'च्या वादात आता संभाजी भिडेंची उडी

सरकारने एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिवांना पदावरून हटवावे आणि पेपरफुटीप्रकरणात अटक झालेल्या आरोपींच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची सखोल चौकशी करावी. अन्यथा आज दिसत असलेला विद्यार्थ्यांचा आक्रोश हळूहळू रोषात रुपांतरीत होईल आणि ते सरकारला परवडणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

विद्यार्थ्यांचा हा आक्रोश पुण्यापुरता मर्यादित राहणार नाही तर प्रत्येक जिल्ह्यात तो दिसेल आणि आज लगेचच तो छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसला. सरकारने तरीही दुर्लक्ष केले तर हा आक्रोश थांबेल असे नाही, तर यापुढे तो प्रत्येक जिल्ह्यात दिसल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पावित्रा आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतला.

Chhatrapati Sambhajinagar Student Protest .jpg
Rahul Gandhi case: मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना मोठा धक्का; आठ वर्षांपूर्वी केलेली चूक महागात पडणार

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा व निवड प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत निर्माण झालेल्या शंकांची निष्पक्ष चौकशी करून विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवावा, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. निवेदनात आयोगाच्या प्रशासनापासून विविध परीक्षांच्या निकालांपर्यंत १३ प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या

१) एमपीएससी अध्यक्ष व सचिवांच्या जबाबदारीचा पुनर्विचार करा, निष्पक्ष व स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.

२) गट-ब परीक्षेतील आक्षेपांवर आठ दिवसांत स्पष्टीकरण द्यावे आणि कथित गैरप्रकारांची चौकशी करावी.

३) एमपीएससी संदर्भातील मुंबई क्राईम ब्रँचचा कथित प्राथमिक चौकशी अहवाल कायदेशीर मर्यादेत सार्वजनिक करावा.

४) अभिजीत लेंडवे यांच्या कार्यकाळातील संबंधित परीक्षांचे स्वतंत्र फॉरेन्सिक ऑडिट करावे.

५) प्रविण पाटील व मयुर ठाकरे यांच्याव्यतिरिक्त अन्य व्यक्ती किंवा कथित एजंट्सच्या सहभागाचीही चौकशी करावी.

६) निरीक्षक परीक्षेच्या संशयास्पद निकालाची व निवड प्रक्रियेची फॉरेन्सिक तपासणी अथवा ऑडिट करावे.

७) वाणिज्य, लेखा, वित्त व तत्सम पदांच्या शैक्षणिक पात्रतेचा पुनर्विचार करून वाणिज्य शाखेतील पात्र उमेदवारांना न्याय्य संधी द्यावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com