Palghar Crime Case: पालघर रुग्णालय कर्मचार्‍यांना मारहाण प्रकरण: शिवसेना 'आमदार पुत्रा'ला निलंबनानंतर आता पोलिसांचा दुसरा मोठा दणका

Palghar Hospital Crime : राज्यात एकीकडे दहीहंडीचा उत्सव जोरदारपणे सुरू असताना दुसरीकडे पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमध्ये कर्मचार्‍यांना शिवसेना आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावितसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती.
Palghar news.jpg
Palghar news.jpgSarkarnama
Published on
Updated on

Palghar News: राज्यात एकीकडे दहीहंडीचा उत्सव जोरदारपणे सुरू असताना दुसरीकडे पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमध्ये कर्मचार्‍यांना शिवसेना आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावितसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणाचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले होते. तसेच उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनीही या मारहाणीप्रकरणी निलंबनाची कारवाई करत दणका दिला होता.यानंतर आता रोहित गावितला दुसरा मोठा दणका बसला आहे.

पालघर रुग्णालय मारहाणप्रकरणी फरार आरोपी आणि आमदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित यांना पोलिसांनी अटक केली आहे. मिरा रोड येथील जीसीसी क्लबमधून रोहित गावित यांना शुक्रवारी (ता.11 सप्टेंबर)माहिती समोर आहे. रोहित गावित यांना मिरा रोड येथील जीसीसी क्लबमधून ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

पालघर पोलीस ठाण्यात रिलीफ हॉस्पिटलमध्ये कर्मचार्‍यांना मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी रोहित गावित यांच्यासह 14 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पालघर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यापासून रोहित गावित यांसह जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये,आमदार पुत्र रोहित गावित यांच्यासह एकूण 14 आरोपींचा पालघर पोलिसांकडून शोध सुरू होता.

अखेर पालघर पोलिसांना आमदार पुत्र रोहित गावित यांना मिरा रोड येथून ताब्यात घेण्यात यश मिळवलं आहे. यापूर्वीही शिवसेनेचे कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी 6 जुलै रोजी तेथील शास्त्रीनगर एका रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती.

Palghar news.jpg
Sindhudurg Crime : मोठी बातमी! शिवसेनेच्या नेत्याच्या घराबाहेर सापडलं ड्रग्स, पोलिसांनी घेतलं ताब्यात

त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं रमेश म्हात्रे यांना फटकारलं होतं. रमेश म्हात्रे यांचं प्रकरण चर्चेत असतानाच पालघरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि आमदार राजेंद्र गावित यांच्या मुलानं रुग्णालयात केलेल्या मारहाणीमुळं प्रकरण चर्चेत आलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com