Parbhani ZP election : धाराशिव, परभणी झेडपीत ऐनवेळी महायुतीने गेम पलटावल्याने विरोधकांचे मनसुबे धुळीस! 'त्या' एका निर्णयाने सत्तेचे गणितच बदलले !

Mahayuti alliance Maharashtra politics News : महायुतीमधील तीनही पक्षाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला व सत्तास्थापन करण्यापूर्वीच गेम पलटावल्याने विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळाले असून त्यांनी घेतलेली 'त्या' एका निर्णयाने सत्तेचे गणितच बदलले आहे.
EKnath shinde, Devendra Fadnavis
EKnath shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुका झाल्या आहेत. निवडणुका होऊन महिनाभराचा कालावधी लोटला असला तरी धाराशिव व परभणी महापालिकेत कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळाली. विशेषतः दोन्ही ठिकाणी महायुतीचे बहुमत होत असताना तीन पक्ष एकत्र येत नसल्याने जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळाली. एकवेळ महायुतीमधील घटक पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना व काँग्रेस यांच्यासोबत आघाडी करून सत्तास्थापन करणार का याची उत्सुकता लागली होती. मात्र, ऐनवेळी महायुतीमधील तीनही पक्षाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला व सत्तास्थापन करण्यापूर्वीच गेम पलटावल्याने विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळाले असून त्यांनी घेतलेली 'त्या' एका निर्णयाने सत्तेचे गणितच बदलले आहे.

धाराशिव झेडपीची निवडणूक शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीत सुरुवातीला भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना (Shivsena), उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेसच्या मदतीने सत्तास्थापन करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, भाजप व शिंदे सेनेच्या हायकमांडने या सर्व फोडाफोडीत हस्तक्षेप करीत महायुती एकत्रित राहील, याची काळजी घेतली. त्यासोबतच तानाजी सावंत गटाचे जिल्हा परिषद सदस्य सोबत राहतील, यावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे या ठिकाणी महायुतीमधील भाजपच्या अर्चना पाटील या अध्यक्ष तर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या उषा गायकवाड या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा झाल्या आहेत.

EKnath shinde, Devendra Fadnavis
OBC corporations : देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीआधी केलेली घोषणा हवेतच, 19 ओबीसी महामंडळे केवळ कागदावरच

दुसरीकडे परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड 18 मार्चला होणार आहे. या ठिकाणीही महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाले होते. या ठिकाणची परिस्थिती आता वरिष्ठ पातळीवरून केलेल्या हालचालीनंतर अखेर निवळणार आहे. या ठिकाणी भाजप व शिंदे शिवसेनेच्या हायकमांडने भाजप (BJP), राष्ट्रवादी व एकनाथ शिंदे यांची शिवसेना या तीन पक्षाच्या नेत्याची एकजूट घडवून आणली. त्यामुळे त्यांच्या बहुमतासमोर विरोधक निष्प्रभ झाले आहेत.

परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. जिल्हा परिषदेत भाजप 24, राष्ट्रवादी 15, शिंदेसेना 5 असे 44 सदस्य महायुतीचे निवडून आले आहेत तर उद्धवसेना 6, काँग्रेस 3 व 1 अपक्ष निवडून आला आहे. भाजपने निकालाच्या दिवशीच शिंदेसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केल्यानंतर राष्ट्रवादीची तगमग वाढली होती. राष्ट्रवादीनेही विरोधकांना एकत्र करून डाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्याला शिंदेसेनेची जोड मिळाली तर भाजपची बाजी कधीही पलटू शकते, अशी स्थिती होती. त्यामुळे भाजप मोठा पक्ष असूनही सत्तेबाहेर राहील अशी परिस्थिती होती. तर दुसरीकडे शिंदे यांच्या सेनेला केवळ एका पदावर तडजोड करण्याची वेळ येते की काय? असे चित्र होते.

EKnath shinde, Devendra Fadnavis
Rajya Sabha Election : ‘ऑपरेशन कमळ’चा काँग्रेस आमदारांवर दबाव; क्रॉस-व्होटिंगची भीतीनं आठ आमदारांना हलविले

परभणीत पहिल्यांदाच होणार भाजपचा अध्यक्ष

परभणी जिल्हा परिषदेच्या इतिहासात आतापर्यंत एकदाही भाजपचा अध्यक्ष झाला नाही. यावेळी पहिल्यांदाच भाजपला तशी संधी चालून आली आहे. नाट्यमय घडामोडी घडत असल्याने अनिश्चिततेचे सावट दिसत होते. मात्र, आता महायुती एकत्र येणार असल्याने त्यांना पहिल्यांदाच ही संधी मिळणार आहे.

EKnath shinde, Devendra Fadnavis
Non Teaching Recruitment : मोठी बातमी: 21 वर्षांची प्रतीक्षा संपली! राज्यात 30 हजार शिक्षकेतर पदांची भरती होणार

जिल्हा परिषदेच्या सत्तेत भाजप सर्वांत मोठा पक्ष असल्याने त्यांना अध्यक्षपदासह दोन सभापतिपदे मिळणार असल्याचे ऐकायला मिळत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षपदासह एक सभापतिपद व शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला एक सभापतिपद येणार असल्याचे समजते.

EKnath shinde, Devendra Fadnavis
Sanjay Jadhav On Babajani Durani : अरे 17 वर्ष आमदार राहिला अन् स्वीकृत नगरसेवक झालास... 'चुल्लूभर पाणी मे डुब मरो' : ठाकरेंचा खासदार बाबाजानींवर घसरला!

झेडपीच्या निवडणुकीत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपची डोकेदुखी वाढली होती. जि. प. च्या राजकारणात आतापर्यंत वरचढ राहिलेली राष्ट्रवादी या संधीचा कधीही फायदा घेण्यास सज्ज होती. भाजपला कोंडीत पकडण्यासाठी सर्वच पक्ष कधी मोट बांधतील, याचा काही नेम नव्हता. त्यामुळे याठिकाणी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता असल्याने भाजपने या ठिकाणी डाव टाकत महायुतीमधील तीन पक्षांना एकत्रित आणले आहे.

EKnath shinde, Devendra Fadnavis
Shiv Sena symbol dispute Supreme Court: शिवसेना-राष्ट्रवादीच्या अंतिम सुनावणीला तब्बल 4 महिन्यांनंतर मिळाला मुहूर्त : साडे तीन वर्षांच्या संघर्षाचा शेवट होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com