

Mumbai News : शिवसेनेत साडे तीन वर्षापूर्वी उभी फूट पडली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारानी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपच्या पाठींब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी दोन्ही शिवसेना सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणी गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी (12 मार्च) शिवसेना (shivsena) पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेशी संबंधित हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यतालिकेत चाळीसाव्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या सुनावणीत शिवसेना पक्ष आणि त्याचे धनुष्यबाण चिन्ह नेमके कोणाच्या ताब्यात राहणार, याबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सध्या हा वाद एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटामध्ये सुरू आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या उद्याच्या सुनावणीत या प्रकरणावर नेमकी कोणती भूमिका स्पष्ट होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात आव्हान
गेल्या साडे तीन वर्षांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगाने 'धनुष्यबाण' चिन्ह आणि 'शिवसेना' नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले होते. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. त्यामुळे गुरुवारी होत असलेल्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यासोबतच 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दादेखील ऐरणीवर आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावरही महत्त्वपूर्ण चर्चा किंवा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या सुनावणीत कोर्टाने काही गंभीर ताशेरे ओढले होते, त्यामुळे गुरुवारी घटनापीठ यावर अंतिम निकाल देणार की तारीख पुढे ढकलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.