OBC Reservation News : मनोज जरांगेंच्या अंतरवालीत 'आरक्षण बचाव'साठी ओबीसींचे बेमुदत उपोषण!

While Manoj Jarange is in Mumbai, an indefinite hunger strike has started in Antrawali to protect OBC reservation rights. : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती तात्काळ रद्द करा.
OBC Protest In Antarwali Sarti News
OBC Protest In Antarwali Sarti NewsSarkarnama
Published on
Updated on

दिलीप दखने

Marathwada News : ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी थेट मुंबईत धडक देऊन आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली गावातच त्यांना आव्हान देण्यात आले आहे. 'आरक्षण बचाव' म्हणत ओबीसी बांधवांनी आज सकाळी साडेअकरा पासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवा, अशी मागणी करत अंतरवालीतच आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (OBC) द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दोन वर्षांपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या अंतरवाली सराटीमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव म्हणत उपोषण सुरू करण्यात आले आहे. मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्यानंतर उच्च न्यायालयाने आज याची गंभीर दखल घेतली. मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असून आंदोलन हाताबाहेर गेल्याचे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने सरकारला जाब विचारला.

मुंबईत येणाऱ्या आंदोलकांना बाहेरच रोखा, दोन दिवसात मुंबई पूर्व पदावर आणा, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. (Maratha Reservation) मुंबईत यावरून वातावरण तापलेले असतानाच इकडे अंतरवाली सराटीत ओबीसी समाजही आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवा, त्यात होत असलेली घुसकोरी थांबवा या मागणीसह 58 लाख कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा, या प्रमाणपत्रांमुळे ओबीसींच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

OBC Protest In Antarwali Sarti News
OBC Reservation News : ओबीसी आरक्षण संपवण्याचे सरकारचे षडयंत्र! खोटी कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करा..

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती तात्काळ रद्द करा, अशी मागणीही उपोषणकर्त्यांनी केली आहे. याशिवाय ओबीसी आणि भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर कराव्यात, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी द्यावा आणि समाजाच्या विकासाला चालना द्यावी, असेही आंदोलकांनी आपल्या मागण्यांमध्ये म्हटले आहे.

OBC Protest In Antarwali Sarti News
Maratha Reservation Video : मराठा आरक्षणप्रश्नी सरकारच्या हालचालींना वेग; देवेंद्र फडणवीसांनी रात्रीच घेतली बैठक, ॲडव्होकेट जनरलही उपस्थित

प्रा. विठ्ठल तळेकर मानवत, बाळासाहेब दखणे अंतरवाली सराटी, बाबासाहेब बटुळे नालेवाडी , श्रीहरी निर्मळ पाथरवाला, आसाराम डोंगरे छत्रपती संभाजीनगर यांनी हे उपोषण सुरू केल आहे. ज्या 58 लाख नोंदी सापडलेल्या आहे त्या बेकायदेशीर आहेत. याचा सविस्तर तपशील जाहिर केला पाहिजे. ओबीसी आरक्षणाचे रक्षण होणे गरजेचे आहे. मंडल आयोगाच्या माध्यमातून आम्ही ओबीसी आरक्षण बचाव करिता लढत आहोत. मनोज जरांगे हे झुंडशाही पध्दतीने वागत आहेत असा आरोपही उपोषणकर्त्यांनी यावेळी केला.

OBC Protest In Antarwali Sarti News
Manoj Jarange Patil : "जरांगेंच्या आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांचा आमच्याकडे कच्चाचिठ्ठा" : भाजप मंत्र्याचा मोठा दावा

दरम्यान मुंबईतील आंदोलन उग्ररूप धारण करत असतानाच ज्या अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा उभा केला त्याच अंतरवालीमध्ये मराठा आरक्षणाला विरोध करत ओबीसींनी आंदोलन छेडले आहे. ओबीसींनी सुरू केलेल्या उपोषणावरून पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष भडकण्याची शक्यता आहे. ओबीसींचे अंतरवाली सराटीत उपोषण सुरू झाल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून गावात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com