Vaibhav Chavan : बोगस क्रीडा प्रमाणपत्रांविरोधात आवाज उठवण जीवावर बेतलं! वैभव चव्हाण मृत्यूप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

Vaibhav Chavan Case: बोगस क्रीडा प्रमाणपत्रांविरोधात तक्रार करणाऱ्या वैभव चव्हाण यांच्या मृत्यूप्रकरणी भावाच्या फिर्यादीवरून कुराश संघटनेच्या प्रतिनिधीसह नागनाथ साबळे यांच्याविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल झाला.
Vaibhav Chavan Audio Clip
Vaibhav Chavan Audio ClipSarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed Crime News : खेळातील बोगस प्रमाणपत्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली असलेल्या आणि अखेर टोकाचे पाऊल उचलणाऱ्या वैभव छगन चव्हाण (वय २६, रा.नवगण राजुरी, ता.जि.बीड) याच्या मृत्यूप्रकरणी अखेर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी जीवाला धोका आहे, असे सांगणाऱ्या वैभवच्या अनेक ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या होत्या, ज्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली होती.

अखेर मृताच्या भावाच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव चव्हाण हा धाराशिव येथील पोलीस भरतीमध्ये स्पोर्ट्स कोट्यातून वेटिंग लिस्टवर पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, त्याच्याच स्पोर्ट्स कोट्यातून शेवटच्या क्रमांकावर असणाऱ्या नागनाथ साबळे या मुलाची भरती झाली होती. याबाबत संशय आल्याने वैभवने सखोल माहिती काढली असता, नागनाथ साबळे याच्याकडे स्पोर्ट्सचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले.

आरोपी क्रमांक २ असलेल्या नागनाथ साबळे याने कुराश संघटनेच्या माध्यमातून हे बोगस प्रमाणपत्र मिळवून भरती लाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ​या भ्रष्टाचाराविरुद्ध वैभव चव्हाण याने चिवट लढा देत क्रीडा आयुक्त कार्यालय, बालेवाडी, पुणे येथे पुराव्यासह अधिकृत तक्रार दाखल केली होती. तसेच विविध ठिकाणी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज केले होते.

Vaibhav Chavan Audio Clip
Sharad Pawar: शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; डॉक्टरांनी प्रकृतीबाबत काय दिली अपडेट?

हे बोगस रॅकेट उघड पडल्यामुळे संबंधित आरोपी वैभवच्या मागे लागले होते. त्याला सतत पाळत ठेवणे, धमकावणे यामुळे वैभव प्रचंड मानसिक तणावाखाली आणि भयभीत अवस्थेत जगत होता. याच दबावातून ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास इमामपूर येथील ज्योतिबा मंदिराच्या परिसरातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवली.

Vaibhav Chavan Audio Clip
Ashok Patil Nilangekar : गोकुळसारखी परिस्थिती येऊ द्यायची नसेल तर पंधरा संचालक निवडून द्या; अशोक पाटील निलंगेकरांनी घेतला धसका

मृत्यूपूर्वी वैभवने आपल्या जीवाला कसा धोका आहे आणि संबंधित लोक आपल्याला कशा प्रकारे मानसिक त्रास देत आहेत, याबाबतच्या ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल केल्या होत्या. या पुराव्यांच्या आधारे आणि फिर्यादी गणेश छगन चव्हाण यांनी दिलेल्या जबाबावरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४२१/२०२६ नुसार बीएनएस २०२३ च्या कलम १०८, ३(५) अन्वये कुराश संघटनेचा प्रतिनिधी व नागनाथ साबळे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.