Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांसाठी शरद पवारांच्या खासदाराने धाडलं फडणवीसांना पत्र; म्हणाले, "मनोजदादांची प्रकृती अन् मराठा समाजाच्या भावना..."

Manoj Jarange Patil Hunger Strike : 'मराठा आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे दिनांक 29 ऑगस्टपासून उपोषणास बसले आहेत. आपल्या न्याय्य हक्कांसाठी त्यांना पुन्हा-पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे, ही अत्यंत वेदनादायक आणि चिंताजनक बाब आहे.'
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil Hunger Strike : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज (ता.०१) चौथा दिवस असून आता प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. जरांगे यांनी आता केवळ चर्चा नको, तर मागण्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली आहे.

तर जरांगे यांनी आंदोलकांना १२ तारखेपर्यंत हळूहळू मुंबईच्या दिशेने जाण्याचं आवाहनही केलं आहे. अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रातून त्यांनी मनोज जरांगेंच्या प्रकृतीची गंभीरता आणि मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेणे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

सोनवणे यांनी फडणवीसांना पाठवलेल्या पत्रात लिहिलं की, 'मराठा आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे दिनांक 29 ऑगस्टपासून उपोषणास बसले आहेत. आपल्या न्याय्य हक्कांसाठी त्यांना पुन्हा-पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे, ही अत्यंत वेदनादायक आणि चिंताजनक बाब आहे.

Manoj Jarange Patil
PM Modi Photo Controversy : मोदींचा फोटो हटवल्याने वाद; सुषमा अंधारेंकडून अमित ठाकरेंची पाठराखण, भाजपवर पलटवार

मनोजदादांच्या प्रकृतीची गंभीरता तसेच मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढाकार घेऊन मनोजदादांशी तातडीने संवाद साधावा आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ठोस व सकारात्मक निर्णय घेऊन त्यांचे उपोषण सोडवावे.

Manoj Jarange Patil
Gokul Controversy : "रॉकेल आणा, पेटवून टाकूया..."; गोकुळच्या संस्था अपात्र केल्याने मुश्रीफांच्या निकटवर्तीयांकडून अधिकाऱ्यांना धमकी

मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्यात संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या संघर्षाला माझा ठाम पाठिंबा आहे. मराठा समाजाच्या न्याय्य मागणीसाठी मी सदैव समाजाच्या सोबत राहीन.', असं लिहित सोनवणे यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत जरांगेंच्या मागण्यावर लवकर निर्णय घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com