Manoj Jarange Hunger Strike : मनोज जरांगेंना सरकारकडून पाच मोठी आश्वासनं, मंत्री विखे पाटलांनी ड्राफ्ट दाखवला तरी उपोषण सुरूच

Radhakrishna Vikhe Patil Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी ड्राफ्ट पाहिल्यानंतर यावर मराठा समाजातील अभ्यासकांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
Manoj Jarange Hunger Strike
Manoj Jarange Hunger Strike sarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उन्हात आपले उपोषण सुरू केले आहे. मराठा उपसमितीचे अध्यक्ष. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेतली. मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित करावे, असे आवाहन विखे पाटील यांनी केले.

उपोषण मागे घ्यावे यासाठी विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या आश्वासनांचे ड्राफ्ट दाखवला. या ड्राफ्टमध्ये पाच मोठी आश्वासन देण्यात आली आहे.

त्यामध्ये मराठा आरक्षण कक्ष पुढील एक महिन्यात सुरू करण्यात येईल, नोंदी शोधणे, प्रमाणपत्र वाटप आणि जात पडताळणीसाठी एक हेल्पलाइन 8 दिवसात सुरू करणार, कुणबी प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी एसओपी तयार केली आहे, आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसाना 15 दिवसात अर्थसहाय्य देण्यात येईल, कामामध्ये निष्काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, अशी आश्वासने दिली आहेत.

जरांगे पाटील यांनी ड्राफ्ट पाहिल्यानंतर यावर मराठा समाजातील अभ्यासकांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यांनी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अभ्यासकांना आपली मते यावर मांडण्यास सांगितले आहे. तसेच आंतरवाली सराटीमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. मात्र, या दरम्यान, आपले उन्हात उपोषण सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.

Manoj Jarange Hunger Strike
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या भेटीला जाण्यापूर्वी विखे, लाड यांचा गृहपाठ! विभागीय आयुक्तांसोबत घेतली बैठक

त्यावर विखे पाटील यांनी ते म्हणाले, चर्चा होत राहतील, मात्र उपोषण करायेच असेल तर तूर्त सावलीत बसून करा, असा आवाहन त्यांना केले. मात्र, जरांगे पाटील हे उन्हात उपोषण करण्यावर ठाम आहेत.

जरांगेंना पाठींबा देण्यासाठी रास्ता रोको

मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरवात केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला. जालन्यात समृद्धी महामार्गावर मराठा समाजाने रस्ता रोको केला. विविध ठिकाणी जरांगे पाटील यांच्या पाठींब्यासाठी आंदोलन होत आहे. काँग्रेस खासदार शाहू छत्रपती यांनी देखील जरांगे पाटील यांना पाठींबा दिला आहे. तसेच कोल्हापूर गॅझेट लागू करण्याची मागणी केली आहे.

Manoj Jarange Hunger Strike
Maratha Reservation : आमदारकीची ऑफर की उपोषणाची चर्चा? उदय सामंतांच्या भेटीनंतर दोन आठवड्यातच मनोज जरांगे पाटील अॅक्टिव्ह

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com