संजय सूर्यवंशी-
Nanded News : मराठा आरक्षण मिळावे, यासाठी मागील काही दिवसांपासून सबंध राज्यभरात आंदोनल, साखळी उपोषणं सुरू आहेत, तर दुसरीकडे मराठा समाजातील तरुण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आता नांदेड जिल्ह्यातही मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नांदेडमधील मरकळ येथील दाजीबा कदम या तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येअगोदर या तरुणाने राज्य सरकारच्या निषेधार्थ चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मराठा आरक्षणासाठी नांदेड जिल्ह्यात चौथा बळी गेला आहे.
महाराष्ट्रात मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाचा विषय चांगलाच तापला आहे. विशेषतः मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्याआधारे ओबीसीचे आरक्षण या मागणीने ओबीसी आणि मराठा असा संघर्ष सुरू झाला आहे.
मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारकडून लिखित मसुदा अद्याप न मिळाल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. मसुद्यावर सही करण्यासाठी मंत्र्यांच्या हातात ताकद नाही का, असा सवाल करत फराळ भरपूर करा आणि आधी सह्या करा, असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.