बीड : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे आधी अपहरण आणि नंतर खुन करुन फेकून दिल्याच्या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थितीत करत लोकप्रतिनिधी आणि नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
तसेच या घटनेचा निषेध करण्यासाठी करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनातही सहभाग घेतला. सरपंचाचे अपहरण करुन खुनाची घटना घडल्यानंतर दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण केल्याची घटना समोर आली. (Manoj Jarange Patil) अपहरण, वाळू माफिया, गोळीबार, खून अशा घटनांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था चिंतेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींसह मास्टर माईंड शोधून ठोस कारवाई करावी, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे, रजनी पाटील, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, नमिता मुंदडा यांनी शासनाकडे केली. (Beed News) सोमवारी मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले. केज पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालण्यासाठी गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
गुन्हा नोंद होईपर्यंत संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. लोखंडी सळ्या, रॉडने मारहाण केल्याने त्यांचा खुन झाला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र, सर्व आरोपींना अटक करुन आरोपींना पाठबळ देणाऱ्याचे नाव समोर आणावे अशी मागणी जिल्हाभरातून केली जात आहे.
मंगळवारी (ता.10) या मागणीसाठी जिल्हाभरातील ग्रामपंचायती बंद ठेवण्यात आल्या. तसेच, सोमवारी रात्री अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर मस्साजोग येथे रात्री सात ते पहाटे तीन वाजेपर्यंत ग्रामस्थाांनी ठिय्या मांडून वाहतूक अडविली. दुसऱ्या दिवशी मंगळवारीही सकाळपासून याच ठिकाणी रास्तारोको सुरु आहे. आरोपींचा शोध लागेपर्यंत मृतदेहाची उत्तरीय तपासणी करणार नाही आणि अंत्यसंस्कार केले जाणार नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे. याच मागणीसाठी केज शहरातही बंद पाळण्यात आला.
आंदोलकांनी एक बंद बस पेटविल्याची आणि केजच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावर दगडफेक केल्याची घटनाही घडली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनीही देशमुख कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच, आंदोलनात काही काळ सहभाग घेतला. दरम्यान, बीडचा बिहार होत असल्याचा आरोपही खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.