

Manoj Jarange New Audio Clip : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाचशे कोटीच्या ऑडिओ क्लिपचा बॉम्ब फोडल्यानंतर, आणखी एक ऑडिओ क्लिपचा बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहेत.
"ही ऑडिओ क्लिप भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट 'शॉट' देणारी ठरेल, त्यामुळे त्यांनी अगोदरच्या ऑडिओ क्लिपचा शोध घ्यावा," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
धाराशिव येथे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधताना, आणखी एक ऑडिओ क्लिप आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. ही ऑडिओ क्लिप पहिल्या ऑडिओ क्लिपपेक्षा डेंजर आहे आणि थेट मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान देणारी असेल, असे सांगून खळबळ उडवून दिली आहे.
कोणती नवीन ऑडिओ क्लिप (Audio Clip) आहे, यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, "त्यांना थोडं अवसानात येऊ द्यात. अनसानात आले की, रट्टा टाकयला सोपं जातं. लांबून टाकायला मज्जा नाही. आपण टोला टाकला की तो खाली जाऊ द्यायचा नाही. त्यांच्या-त्यांच्यातील आहे इथून पुढेचं. त्यांच्या-त्यांच्यातील लचांट आहे. माझ्या गळ्यात लचांट गुंतवीलं होतं, आता त्यांच्याच गळ्यात लचांट गुतलं आहे."
'आताची क्लिप आहे ती डेंजर आहे. फडणवीससाहेब आणि शिंदे साहेबांना शॉट बसेल अशी आहे. भयाण आहे. त्यासाठी अगोदरच्या क्लिपचा शोध लावणे, सगळ्यांना अटक करणे, एसआयटीमधून आपापला दोष मान्य करणे, हे भाजपचेच आहे, यांनी परस्पर केले होतं. शिंदे साहेबांनी देखील मान्य करावं, यांनी काळजावरती वार का केला, पाचशे कोटी दिले म्हणून. त्यांनीही म्हणावं, मागून एकमेकांना संपवायचे काम करत होते. विशेष करून, मराठ्यांचे आंदोलन चिरड्यासाठी, ही सगळी पडद्यामागची प्लॅनिंग होती, हे त्यांनी मान्य करावं,' असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
पाचशे कोटीच्या ऑडिओ क्लिप खोटी ठरवणार आहेत, असे सांगून, हा म्हटल्यास, भाजप मराठ्यांतून संपते, नाही म्हटल्यास, शिंदेसाहेब आणि त्यांच्या दोघांत भांडणं लागतात, मला का बदनाम केले, असे शिंदे साहेब म्हणतील. मराठे इकडून म्हणतील, आमचे आंदोलन चिरडण्याचा अधिकार तु्म्हाला कोणी दिला होता, असा पेच यांच्यासमोर आहे. डेंजर कोडं यांच्यासमोर आहे, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
पहिल्या ऑडिओ क्लिपविषयी चौकशीला अजून आमच्याकडे कोणीही आलेले नाहीत. पुढची क्लिप कधी काढणार, यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, 'थोडं थांबाना...' असे म्हणून राजकीय उत्सुकता ताणून धरली आहे. जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ऑडिओ क्लिपचा मुद्दा काढून महायुतीमधील भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे टेन्शन वाढवलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.