Meenakshi Shinde Volvo Car : दीड कोटींच्या व्होल्वो कारने मीनाक्षी शिंदेंच्या अडचणी वाढवल्या! ACBकडे तक्रार; 200 कोटींच्या कामांचाही उल्लेख

ACB complaint filed against former Thane mayor Meenakshi Shinde over an alleged Rs1.5 crore Volvo car registered municipal contractor name. Complaint also raises questions over Rs 200 crore civic works : ठाणे महापालिकेच्या कंत्राटदाराच्या नावावर आलिशान कार; निवडणूक प्रतिज्ञापत्रात चारचाकीचा उल्लेख नसल्याचा सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप, कागदपत्रांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव!
Meenakshi Shinde
Meenakshi ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Meenakshi Shinde ACB Complaint : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे ठाणे जिल्ह्याचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणावरून, संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले एकनाथ शिंदे शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

माजी महापौर मीनाक्षी शिंदेविरोधात आलिशान कारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी ही तक्रार केली आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shivsena) माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना महापालिकेच्या कंत्राटदाराने दीड कोटी रुपयांची आलिशान व्होल्वो कार भेट दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी याबाबत पुराव्यानिशी ही तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. विशेष म्हणजे लेखी तक्रारीत निवडणूक आयोगाकडे निवडणुकीसाठी दाखल केलेले नामनिर्देशक पत्र जोडले आहे.

आलिशान व्होल्वो कारमुळे माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याभोवती पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येदरम्यान, मीनाक्षी शिंदे यांची राहनीमान आणि वाहनांचा वापर चर्चेत आला होता. आता पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाकडे मीनाक्षी शिंदे यांच्याकडील वाहनावरून तक्रार झाल्याने ते चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.

Meenakshi Shinde
Raigad Bribery Case : सदनिकेच्या करारनाम्यासाठी दीड लाखांचा सौदा! एक लाख आधीच घेतले, 50 हजार स्वीकारताना दुय्यम निबंधक ACBच्या जाळ्यात!

महापालिकेतील कंत्राटदार प्रमोद कृष्णा पवार यांच्या नावावर हे वाहन नोंदणीकृत आहे. निवडणुकीत नामनिर्देश पत्राबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मीनाक्षी शिंदे यांनी पतीच्या व स्वतःच्या नावावर केवळ तीन दुचाकी दाखवल्या असून चारचाकीचा उल्लेख टाळला आहे, अशी देखील अजय जेया यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Meenakshi Shinde
Kangana Ranaut FIR : गांधी कुटुंबाच्या मृत्यूंचा उल्लेख भोवला! भाजप खासदार कंगना राणावत यांच्याविरोधात थेट FIR; हिमाचलमध्ये खळबळ!

कंत्राटदार पवार यांना प्रभाग क्रमांक तीनमधील विशेष निधीतून सुमारे 200 कोटींची कामे मिळाल्याचा आरोप करत या कामांच्या चौकशीची मागणी केली आहे. तसेच या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचेही महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. अजय जेया यांनी एसीबीकडे पुराव्यादाखल कागदपत्रे, छायाचित्रे व व्हिडीओ सादर केले आहेत. त्यामुळे या तक्रारीची चौकशी, 'ओपन' होते की, 'क्लोज'पद्धतीने होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.