Manoj Jarange Patil : आता माघार नाही म्हणजे नाहीच...! आजारी जरांगे पाटलांनी दवाखान्याच्या बेडहून सभास्थळ गाठलंच

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांची धाराशिव जिल्ह्यातच प्रकृती खराब झाली होती.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarakrnama

Beed News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी मोठा लढा उभारला आहे. उपोषणानंतर त्यांनी आता राज्यात विविध ठिकाणी सभांचा धडाका लावत हा लढा धगधगता ठेवतानाच सरकारवरील दबाव कायम कसा राहील याची पुरेपूर काळजी देखील घेतली आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली मुद्त जवळ जवळ येत असतानाच जरांगे पाटील अधिक आक्रमक झाले आहेत.याचदरम्यान, सोमवारी धाराशिव जिल्ह्यातच त्यांची प्रकृती खराब झाली. पण त्यांनी आता माघार नाही म्हणजे नाही चा पत्ता गिरवत आजारी असतानाही दवाखान्याच्या बेडहून सभास्थळ गाठलेही अन् गाजवलेही...

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची सोमवारी धाराशिव जिल्ह्यातच प्रकृती खराब झाली होती.त्यामुळे त्यांना अंबाजोगाई जवळील सभेत खुर्चीवर बसून भाषण करावे लागले. सभेनंतर मनोज जरांगे पाटील अंबाजोगाईतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. उपचार घेऊन बेडवरुनच ते मंगळवारी थेट पुन्हा मैदानात उतरले आणि केज तालुक्यातील बोरीसावरगावची सभा करुन व धारुर व माजलगावकडे रवाना झाले.

Manoj Jarange Patil
Shinde Government : शिंदे सरकार, सावध राहा, विरोधक नव्हे; तुमचेच आमदार तुम्हाला...

मराठा समाजाला सरकसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सप्टेंबर महिन्यात अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे उपोषण केले. त्यानंतर सरकारने त्यांना महिनाभराचा कालावधी मागीतला. या कालावधीनंतर पुन्हा त्यांनी उपोषण केले. दोन वेळच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर अनेक दिवस छत्रपती संभाजी नगरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. (Maratha Reservation)

आता शिंदे सरकारला (Shinde Government) आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या काळात त्यांच्या विविध ठिकाणी सभा होत आहेत. सभांचे तगडे नियोजन आणि गर्दीही जोरात जमत आहे. मात्र, यापूर्वीची दोन उपोषणे व आता सभांसाठी प्रवास आणि जागोजागी सत्कार यामुळे त्यांच्या प्रकृतीवर ताण आला आहे.

सोमवारी धाराशिव जिल्ह्यात सभेला गेल्यानंतर त्यांची प्रकृती खराब झाली होती. पण तरीही त्यांनी रात्रीची अंबा सहकारी साखर कारखाना परिसरातील सभा घेतलीच. प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना खुर्चीवर बसून जनमसमुदायाला संबोधित करावे लागले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, सभेनंतर ते अंबाजोगाईतील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले. रात्रभर त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी मनोज जरांगे पाटील केज तालुक्यातील बोरीसावरगावला सभेसाठी पोहोचले. येथील सभा करुन ते धारुर व माजलगाव तालुक्यातील हरकी लिमगावला सभा घेणार आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Manoj Jarange Patil
Nagar Political News : 'सामंतां'च्या स्वाक्षरीने 'पवारां'च्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com