Manoj Jarange Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपचा सोर्स देण्यास जरांगे तयार; पण फडणवीस-शिंदेंसमोर ठेवली 'ही' मोठी अट

Manoj Jarange: ₹500 Crore Audio Clip Source : ऑडिओ क्लीप मिळवण्याचे काम जोखमीचे होते. आम्हाला कसलीही भीती नाही, पण सोर्सच्या जीवाला धोका होऊ नये, ही आमची भूमिका असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.एसआयटी पथकाला ऑडिओ क्लीप तपासण्यासाठी आवश्यक ती सगळी मदत करण्याची आपली तयारी असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगीतले.
Manoj Jarange | Rs 500 Crore Audio Clip | SIT Probe
Manoj Jarange | Rs 500 Crore Audio Clip | SIT ProbeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nanded News, 05 Nov : पाचशे कोटी रुपये दिल्याचा उल्लेख असलेल्या कथित ऑडिओ क्लीपच्या चौकशीसाठी सरकारने नेमलेल्या एसआयटी पथकाने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यांशी संपर्क साधला. तपासकामासाठी सदर क्लीप देण्याची मागणी करणारे पत्र एसआयटीने जरांगे पाटील यांना पाठवले होते. त्यानंतर आता या ऑडिओ क्लीपमागचे सोर्स देण्याची मागणीही होऊ लागली आहे.

यावर मनोज जरांगे पाटील यांनी सोर्स समोर यायला तयार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जि‍विताला धोका होणार नाही, याची हमी द्यावी, असे आवाहन केले आहे. एसआयटीच्या पत्रासंदर्भात जरांगे पाटील यांना माध्यमांनी विचारले असता, नांदेड दौऱ्यावर असतानाच आपल्याला ऑडिओ क्लीप देण्याबाबतचे पत्र मिळाले होते. मी माझ्या वकीलांना ती ऑडिओ क्लीप देण्यास सांगितले होते. आतापर्यंत कदाचित दिलीही असले, मी त्याबाबतची माहिती घेतली नाही.

राहिला प्रश्न सोर्स देण्याचा तर मला त्याची गरज वाटत नाही. कारण सरकारमधील मंत्र्यांकडे देखील ही ऑडिओ क्लीप आहे. तरी सरकारला सोर्स हवा असेल तर त्यांनी संबंधितांच्या जीवाला धोका होणार नाही, याची हमी द्यावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर येऊन जर सांगीतले की आम्ही त्या सोर्सच्या जीवाला कुठलाही धोका होऊ देणार नाही, तर ते समोर यायला तयार आहेत.

Manoj Jarange | Rs 500 Crore Audio Clip | SIT Probe
Satej Patil : 'गोकुळ'साठी सतेज पाटलांची आता आरपारची भूमिका : 'या' तारखेपासून कोल्हापूरकर थेट रस्त्यावरच्या लढाईला सुरूवात करणार

शेवटी ऑडिओ क्लीप मिळवण्याचे काम जोखमीचे होते. अशा कामामध्ये संबंधित व्यक्तीच्या जीवाला धोका होऊ शकतो. आम्हाला कसलीही भीती नाही, पण सोर्सच्या जीवाला धोका होऊ नये, ही आमची भूमिका असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.एसआयटी पथकाला ऑडिओ क्लीप तपासण्यासाठी आवश्यक ती सगळी मदत करण्याची आपली तयारी असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगीतले. त्यांच्या मंत्र्यांकडे पण ही ऑडिओ क्लीप आहे, पण ते जर सरकारला ती देणार नसतील, यामागे त्यांचा काही डाव असेल तर आम्ही सोर्ससह ती देऊ, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange | Rs 500 Crore Audio Clip | SIT Probe
ECI reforms : मोठी बातमी : निवडणूक आयुक्तांमधील मतभेद मिटले? कामाच्या जबाबदाऱ्यांचे नव्याने वाटप, महाराष्ट्र कुणाकडे?

नेमके प्रकरण काय आहे?

२० ऑक्टोबर २०२६ रोजी बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे झालेल्या दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी एक गंभीर आरोप केला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून त्यांना आंदोलन थांबवण्यासाठी ५०० कोटी रुपये दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती, असा दावा त्यांनी केला. हा पैसा एकनाथ शिंदे यांच्यामार्फत दिल्याचेही त्यांनी म्हटले. जरांगे यांनी जालना येथे पत्रकार परिषद घेऊन सुमारे ३२ मिनिटांची ऑडिओ क्लिप ऐकवली.

या क्लिपमधील एका महिलेचा आवाज असल्याचे सांगितले जाणारे संभाषण ५०० कोटी रुपये जरांगे यांना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत दिल्याचा दावा करते. क्लिपमध्ये आणखी काही व्यक्ती मराठवाड्यात जरांगे यांचा प्रभाव कमी करण्यासाठी, त्यांच्या विरोधात वातावरण तयार करण्यासाठी आणि राजकीय पातळीवर त्यांना लक्ष्य करण्यासाठी चर्चा करत असल्याचे ऐकू येते, असा जरांगे यांचा दावा आहे. या ऑडिओ क्लीपची तपासणी फॉरेन्सीक लॅबमध्ये करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटीकडून केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.