Manoj Jarange Patil : 'जरांगे पाटलांच्या एका वाक्यावर...'; ठाकरेंच्या बड्या नेत्याचा थेट सरकारला गंभीर इशारा,सरकारचे टेन्शन वाढणार!

Manoj Jarange Patil latest news today : मनोज जरांगे पाटील यांच्या एका वक्तव्यावर ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने सरकारला गंभीर इशारा दिला आहे. या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अकरावे बेमुदत उपोषण अंतरवाली सराटीमध्ये सुरू आहे. सरकारचे शिष्टमंडळ, मंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक अशा सगळ्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्यासाठी साकडे घातले. पण सरकारवर विश्वास ठेवून पाणी, सलाईन घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी पुन्हा ते बंद केले.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला. सरकारने तातडीने या आंदोलनाची दखल घ्यावी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात, असे दानवे म्हणाले. माध्यमांनी त्यांना सविस्तर निवदेन करण्यास सांगीतले मात्र आपण यावर बोलणार नाही, असे म्हणत दानवे व्यासपीठावरून निघाले.

Manoj Jarange Patil
Sunetra Pawar : मोठी बातमी! अजितदादांनंतरच्या सहकारातील मोठ्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुनेत्रा पवारांचे जाहीर संकेत

परंतु मनोज जरांगे पाटील यांनीच दानवे यांना तुम्ही बोला, असे सांगीतले आणि दानवेंनी सरकारला गंभीर इशारा दिला. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची वेळीच दखल घ्यावी, अन्यथा हे आंदोलन हाताबाहेर गेले तर गावागावात लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यावर सरकारने जर इच्छाशक्ती ठेवली तर यातून समाजाचे आणि राज्याचेही हित साधले जाईल. या मागण्या मान्य करण्याची आवश्यकता आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे. दरम्यान, १६ नगरसेवकांच्या अपात्रतेच्या विषयावर विचारले असता मी यावर इथे बोलणार नाही, ही माझी नम्र विनंती आहे.

Manoj Jarange Patil
Someshwar Election: सुनेत्रा पवारांचं आवाहन युगेंद्र पवारांनी 24 तासांतच धुडकावलं : सोमेश्वरच्या निवडणुकीत पॅनेलची घोषणा

इथे फक्त मनोजदादा जरांगे यांच्या उपोषणाविषयी बोलण्यासाठी आलो असल्याचे सांगत राजकीय विषय बाहेर बोलू, असे ते म्हणाले. मी मनोजदादांशी दोन-चार विषयांवर बोललो आहे. ते आता सगळ्यांसमोर सांगण्याची गरज नाही, सरकारने संवेदनशीलतेने हा विषय गतीने हाताळावा, असे आवाहन दानवे यांनी यावेळी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com