Manoj Jarange Video : '...तर दांडकं हातात घेऊ', मुख्यमंत्री फडणवीसांना मनोज जरांगेचा इशारा

Santosh Deshmukh Murder Case Manoj Jarange Warns CM Fadnavis : जरांगे पाटील म्हणाले, माझ्या जातीवर अन्याय केला तर त्याला मी सोडत नाही. तो किती मोठा जाहगिरदार असला तरी मी सोडणार नाही.
Devendra Fadnavis-Manoj Jarange Patil
Devendra Fadnavis-Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil News: संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक करण्यासाठी आलेल्या मोर्चाला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला. ते म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता, अधिकार येऊन मराठ्यांना न्याय मिळत नसेल ते जातिवादी मंत्र्यांना पोसत असतील तर आम्हाला हातात दंडुके घ्यावे लागणार आहेत.'

'मराठ्यांना संपवायला निघणार मंत्री तुम्ही सांभाळणार असाल,साध्या साध्या आरोपींना तुम्ही पकडणार नसाल तर अवघड आहे. आम्ही खवळलो तर आम्हाला नाव ठेऊ नका', असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Devendra Fadnavis-Manoj Jarange Patil
Anjali Damania News : बीडमधील मूक मोर्चातून अंजली दमानियांची ऐनवेळी माघार, घेतला 'हा' मोठा निर्णय

जरांगे पाटील म्हणाले, माझ्या जातीवर अन्याय केला तर त्याला मी सोडत नाही. तो किती मोठा जहागीरदार असला तरी मी सोडणार नाही. मराठ्यांच्या बाजुने जे आमदार असतील ते ओबीसी असो नाहीतर मराठा कुठल्याही पक्षाचे असो त्यांच्यामागे मराठा समाजाने ठामपणे उभे राहावे.

मुख्यमंत्र्यांची भेट घ्या

मनोज जरांगे पाटील म्हणाले, माझी एक विनंती आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदारांना यांनी एकत्रितपणे मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी. मुख्यमंत्र्यांकडे जा संतोष देशमुख हत्या प्रकरणात जेवढ्यांची नाव आहेत त्यांना आत टाका, अशी मागणी करा. तुम्ही त्यांना आत टाकले तर मग कशाला मोर्चा काढायची गरज आहे. जेवढी नाव घेतली त्यांना अटक करा.

तुम्ही तयार राहा

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सावध राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, धाडसी बना हे आणखी हल्ले करू शकतात. आता वाट पाहायची नाही. आता जशाला तसे उत्तर द्या. ते आरोपींना पकडतात की नाही हे पाहू, आपण मराठे आहोत मराठे यांना पाणी पाजायचं. आपल्याला आपल्यासाठी लढावं लागेल त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात मोर्चाची तयारी करा, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.

Devendra Fadnavis-Manoj Jarange Patil
Hasan Mushrif : धनंजय मुंडेंचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस घेणार का? हसन मुश्रीफांनी जाहीर केली भूमिका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com