Vichare Vs Mhaske : राजन विचारेंची उच्च न्यायालयात धाव अन् नरेश मस्केंना नोटीस, अडचणी वाढणार?

Rajan Vichare Vs Naresh Mhaske : राजन विचारे यांचा पराभव करत नरेश मस्के विजयी झाले होते. पण, मस्के यांच्या खासदारकीविरोधात राजन विचारे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
naresh mhaske rajan vichare
naresh mhaske rajan vicharesarkarnama
Published on
Updated on

लोकसभेला ठाण्यात शिवसेनेचे ( शिंदे गट ) नरेश मस्के यांनी राजन विचारे यांचा पराभव करत शिवसेनेला ( ठाकरे गट ) धक्का दिला होता. नरेश मस्के जवळपास दोन लाखांच्या मताधिक्यानं निवडून आले होते.

यातच मस्के यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नरेश मस्के ( Naresh Mhaske ) यांच्या खासदाकीविरोधात शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं ( Mumbai High Court ) मस्के यांच्यासह 22 जणांना नोटीस बजावली आहे.

नरेश मस्के यांची खासदारकी रद्द करण्यासाठी राजन विचारे ( Rajan Vichare ) यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याप्रकरणी उच्च न्यायालयानं मस्के यांना नोटीस बजावली आहे.

naresh mhaske rajan vichare
Rahul Shewale Defamation Case: राहुल शेवाळेंची मानहानी करणं उद्धव ठाकरे, राऊतांना भोवलं; 2 हजारांचा दंड

प्रकरण काय?

नरेश मस्के एका प्रकरणात दोषी असताना सुद्धा त्यांनी निवडणूक लढवल्याबाबत राजन विचार यांनी आक्षेप नोंदवला आहे. मस्के यांच्या प्रतिज्ञापत्रात मात्र त्यांनी दोषी नसल्याचा खोटा उल्लेख केल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाची ही दिशाभूल असल्याचा आरोप विचारे यांनी केला आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती रियाझ छागला यांनी सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आहे. या याचिकेवर 2 सप्टेंबरपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.

naresh mhaske rajan vichare
Eknath Shinde : 'तू राहशील नाही तर मी' ठाकरेंनी फडणवीसांना दिलेल्या चॅलेंजला मुख्यमंत्री शिंदेंचे उत्तर,'मनगटात जोर...'

मस्केंचा विजय...

ठाण्यात लोकसभेला दोन्ही शिवसेना आमने-सामने उभ्या ठाकल्या होत्या. तत्कालीन खासदार राजन विचारे यांच्याविरोधात शिंदे गटानं मस्के यांना उमेदवारी दिली होती. याठिकाणी राजन विचारे यांचा मस्के यांनी पराभव केला. नरेश मस्के यांना 6 लाख 32 हजार 789 मते पडली. तर राजन विचारे यांना 4 लाख 58 हजार 519 मते मिळाली. जवळपास 1 लाख 74 हजार मताधिक्यांनी मस्के निवडून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com