Nana Patole: पटोलेंचा फडणवीस सरकारवर संताप; म्हणाले, 'व्हीआयपीं'च्या मुलाबाबत पोलिसांनी जी तत्परता दाखवली, ती संतोष देशमुख...

Congress Leader Nana Patole On Mahayuti Government : माजी मंत्री व शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरणाची अफवा पसरताच पोलिसांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. विदेशात जाण्यासाठी उड्डाण घेतलेल्या विमानाला थांबवले.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : परभणी आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण हे दोन्ही प्रकरणे वेगवेगळी असली तर पोलिसांनी यामध्ये बजावलेल्या भूमिकेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महायुती सरकारवर तोफ डागली. व्हीआयपीच्या मुलाबाबत पोलिसांनी जेवढी तत्परता दाखवली तेवढी सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबाबत का दाखवली नाही, असा सवाल करून त्यांनी मंत्रालय आणि डीजी ऑफिसमधून सर्व कारभार सुरू असल्याचा आरोपही केला.

माजी मंत्री व शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या मुलाचे अपहरणाची अफवा पसरताच पोलिसांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. विदेशात जाण्यासाठी उड्डाण घेतलेल्या विमानाला थांबवले. ऋषीराज सावंत यांना परत आणले. दुसरीकडे सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतरही गुन्हे दाखल केले जात नाही, पीडित कुटुंबीयांना न्याय दिला जात नाही. त्यांना मोर्चे काढावे आणि आंदोलन करावे लागत आहे.

सत्ताधारी पक्षाचा आमदारच या प्रकरणात पोलिसांना माफ करा, गुन्हे दाखल करू नका अशी मागणी करीत आहेत. सरपंच देशमुख यांच्या प्रकरणात आका म्हणून ज्यांचा वारंवार उल्लेख केला जातो त्या मंत्र्याला पाठीशी घातले जात आहे. त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमतसुद्धा सरकार दाखवत नाही. यावरून सरकार सत्तेचा दुरुपयोग करीत असल्याचे स्पष्ट होते.

Nana Patole
Tanaji Sawant : राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले ऋषिराज सावंतांच्या गायब होण्याचे कारण; तानाजी सावंतांवर गुन्हा नोंदविण्याचीही केली मागणी

गृहविभागाचे काम मंत्रालयातून तसेच डीजी ऑफीसमधून केले जात आहे. याचा जाब आम्ही विचारणा आहोत. तीन मार्च पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही या सरकारचे पोस्टमार्टम करणार असल्याचा इशाराही नाना पटोले यांनी दिला.

राहुल सोलापूरकरच नव्हे तर महायुती सरकारमधील डझनभरापेक्षा मंत्री महापुरुषांचा सातत्याने अपमान करत असतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकरची जीभ कापली पाहिजे अशी मागणी पटोले यांनी केली.

Nana Patole
BJP Politics : कोकणात महायुतीत पक्ष वाढीची स्पर्धा; भाजपचा मास्टर स्ट्रोक, कुडाळ येथे उद्या भाजपचा मेळावा

महापुरुषांचा अपमान केला जात काहीच कारवाई केली जात नाही. हे सरकार झोपले आहे का? महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना सरकारला बक्षीस द्यायचे आहे का? अशी विचारणाही नाना पटोले यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com