Omprakash Nimbalkar On Jarange Patil : जरांगेंच्या आंदोलनाची धग सत्ताधारी आमदार-खासदारांपर्यंत; निंबाळकरांना थेट जाब (Video)

Omprakash Nimbalkar Jarange Patil news : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाच्या घोषणेनंतर मराठा समाजातील युवकांचा लोकप्रतिनिधींना थेट सवाल; ओमप्रकाश निंबाळकरांशी संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
Omprakash Nimbalkar viral video
Maratha youth questions Omprakash NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil Maratha protest: मराठा आरक्षणात सरकारकडून दगाफटका झाल्याचे सांगत, मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. मुंबईकडे कूच करण्याची घोषणा आणि तयारी सुरू करण्यात आली आहे. मराठवाड्यासह राज्यात मराठा समाजाने आंदोलनासाठी आक्रमकपणे तयारी करत आहे. काही आंदोलक थेट लोकप्रतिनिधींशी संवाद साधून, विचारणा करत आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेत नुकताच दाखल झालेले, खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांना थेट मराठा समाजातील युवकांनी मोबाईल संपर्क करून, विचारणा केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) निर्णायक लढाईची घोषणा करताना, मुंबईला जाण्याची तयारी सुरू केली आहे. ही घोषणा करण्यापूर्वी त्यांनी मराठा समाजाशी संवाद साधताना, राज्यातील सत्ताधारी महायुतीवर चांगलीच आगपाखड केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट टार्गेट केले.

जरांगे पाटील यांचा सर्वाधिक रोख हा एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) होता. जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे शिवसेना टार्गेट केल्याने, आता मराठा समाजातील आंदोलक, लोकप्रतिनिधींशी संपर्क करून जाब विचारू लागले आहे.

मराठा समाजातील एका युवकाने थेट एकनाथ शिंदे शिवसेनेत नुकताच दाखल झालेले खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांना मोबाईलवर संपर्क करून, जरांगे पाटील 14 दिवसांपासून समाजासाठी अन्न-पाण्यावाचून बसले आहेत, तुम्ही भेटायला का आले नाहीत, असा जाब विचारला.

Omprakash Nimbalkar viral video
Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची भाषा महायुतीला खटकली; मराठवाडी लहेजा ठरतोय नवा संघर्षबिंदू

खासदार निंबाळकर यांना विचारणा करणारा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे. परंतु या व्हिडिओमधील आवाजाबाबत खासदार निंबाळकर यांच्याकडून पुष्टी मिळालेली नाही.

Omprakash Nimbalkar viral video
Crude Oil Price : तेलाच्या किंमतींचं गणित बदललं! आता गुणवत्ता नाही, ‘लोकेशन’ ठरवतंय भाव; भारतावर काय परिणाम?

फोनवरील संवादाला थेट सुरूवात

या संवादाची सुरूवात असे होते की, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तुम्ही का सपोर्ट करत नाहीत? असा सवाल मराठा समाजाच्या युवकाने खासदार निंबाळकरांना थेट करत झाली आहे. मनोजदादांच्या उपोषणाला सुरू असतानाही तुम्ही का गेला नाही? असा दुसरा प्रश्न मराठा आंदोलकांचा होता.

अकरावेळा जावून आलोय...

खासदार निंबाळकर यांनी, अकरावेळा जावून आलो ते दिसलं नाही का? असा प्रतिप्रश्न केला. यावर आंदोलकाने या टप्प्यात गेला नाहीत, आता आंदोलन सुरू आहे, असा प्रश्न केला. यावर निंबाळकर यांनी सावरासावरी करत, आमदार कैलास पाटील जावून आले ना, असे सांगितले.

आमदार कैलास पाटलांकडे बोट...

यावर आंदोलकाने कैलास पाटील हे शिवसेना उध्दव ठाकरे पक्षा, तुम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेचे, त्यांचा अन् तुमचा काय संबंध, असा प्रश्न केला. दादा हे चुकीचे आहे, समाजासाठी आम्ही तुम्हाला मतदान करतो, असे आंदोलक म्हणत असतानाच, समोरून मोबाईलवरचा आवाज बंद होतो.

सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढणार?

या व्हिडिओमुळे मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्यासाठी सत्तेतील राजकीय पक्षांविरोधात आक्रमक झाले असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. यात सर्वाधिक भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना आगामी काळात टार्गेट होणार असल्याचे दिसते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com