Manoj Jarange: मनोज जरांगेंचं निर्णायक आंदोलनाच्या दिशेनं पाऊल! उद्या बोलावली महत्वाची बैठक; प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन

Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंदोलकांना मुंबईला जाण्याचं आवाहन केलं आहे, पण त्यांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंदोलकांना मुंबईला जाण्याचं आवाहन केलं आहे, पण त्यांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. तत्पूर्वी त्यांनी उद्या दुपारी १२ वाजता आंतरवलीत महत्वाची बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील प्रत्येक मराठा व्यक्तीनं हजर रहावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यामुळं आता ही बैठक जरांगेंच्या आंदोलनाच्या दृष्टीनं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

जरांगेंनी नेमकं काय केलंय आवाहन?

मनोज जरांगेंनी म्हटलं की, १२ सप्टेंबर दुपारी बारा वाजता शक्यतो, महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील बांधवांनी प्रत्यक्ष या बैठकीला उपस्थित राहावं, अशी समाजाच्यावतीनं सांगणं आहे. कोणीही हयगई करु नका, कोणाला वाटत असेल आम्ही मोबाईलवर, युट्यूबवर किंवा टीव्हीवर घरी बघू. पण आता मात्र अटितटीचा सामना आहे. घरी बसून टीव्हीवर बैठका करण्याचे आता दिवस नाहीत.

Manoj Jarange Patil
Sanjay Jadhav Vs Manoj Jarange : संजय जाधवांनी मागितली जरांगे पाटलांची जाहीर माफी : माझ्यावर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार; भावना दुखावल्या असतील तर...

प्रत्येकजण दिसला पाहिजे, मराठा समाजाची ताकद दिसली पाहिजे. म्हणून तुम्हाला वाटत असेल की आपण टीव्हीवर बघताना आपल्या तारीख कळाली आणि त्यानंतर आपण मुंबईला जाऊ तर त्यांना माझं सांगण आहे की, आता अटीतटीचा सामना आहे. अंतिम टप्प्यात समाजाची लढाई आली आहे त्यामुळं तुम्ही प्रत्यक्ष बैठकीला हजर राहिलं पाहिजे. तुम्ही टीव्हीच्या भरवशावर राहू नका, समाजाची हार होऊ देऊ नका.

Manoj Jarange Patil
Solapur BJP : ठाण्यातील शिबिराला सोलापूर भाजपच्या 26 नगरसेवकांची दांडी; पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल, दांडीबहाद्दारांना नोटिसा

आपण गैरहजर राहिल्यास संदेश वेगळा जातो आणि समाजाला त्यामुळं पुढच्या समस्येला समोरं जावं लागू शकतं. शक्य झालंच नाहीतर ज्यांना शक्य होईल त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला उद्या शनिवारी, दुपारी बारा वाजता असणाऱ्या बैठकीला प्रत्यक्ष हजर राहून साक्षीदार व्हावं. आपण मुंबईचा जो मार्ग आखणार आहोत, त्या रस्त्यावर महाराष्ट्रातील सर्व बांधवांनी उपस्थित राहावं, ज्यांना मुंबईला यायचं आहे त्यांनी त्याच मार्गानं यायचं आहे. तसंच ज्यांना येणं शक्य होणार नाही त्यांनी त्याच मार्गावर येऊन आम्हाला त्याच मार्गावर येऊन प्रोत्साहन द्यायचं आहे, असं आवाहन यावेळी मनोज जरांगे यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com