Manoj Jarange Hunger Strike : मोठी बातमी! मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित

Antarwali Sarati villagers News अंतरावाली सराटी या त्यांच्या गावातूनच आंदोलनास दर्शवण्यात आला आहे विरोध
manoj jarange patil
manoj jarange patil

Maratha Reservation : लोकसभा निवडणुकीचे निकालास अवघे काही तासंच शिल्लक आहेत. उद्या (मंगळवार, 4 जून) रोजी निकाल जाहीर होणार आहेत. अगदी गल्लीपासून ते दिल्लापर्यंत सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. तर दुसरीकडे उद्यापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे देखील उपोषणास बसणार होते. मात्र जरांगे यांनी आपला निर्णय बदलत उद्याचं आंदोलन स्थगित केलं आहे. आता निवडणूक निकालानंतर म्हणजेच 8 जून रोजी जरांगे उपोषणास बसणार असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे मनोज जरांगेंच्या या उपोषण आंदोलनास त्यांच्याच अंतरवाली सराटी या गावातूनच विरोध दर्शवण्यात आला आहे. गावच्या उपसरपंचासह 5 ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे यांच्या गावातील उपोषणाला उघडपणे विरोध दर्शवला आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून या निवेदनावर 70 गावकऱ्यांच्या सह्या आहेत.

manoj jarange patil
Manoj Jarange Patil hunger strike: मनोज जरांगेंच्या उपोषणाला आता अंतरवालीच्या गावकऱ्यांचाही विरोध!

गावकऱ्याच्या विरोधानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. जिल्हा प्रशासनने उपोषणाला परवानगी देऊ नये, गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याचे निवदेनात नमूद करण्यात आले होते.

तर आचारसंहितेच्या नावाखाली प्रशासनाकडून खोटे गुन्हे दाखल केले जातील, म्हणून कदाचित जरांगे यांनी सावध भूमिका घेतल्याचेही बोलले जात आहे. तर गावकऱ्यांच्या विरोधामुळे आपण उद्याचं आंदोलन स्थगित केलं नसल्याचं जरांगेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे.

manoj jarange patil
Manoj Jarange Patil : 'एक्झिट पोल'मध्ये महायुतीला मोठा फटका; जरांगे पाटलांनी 'या' दोन शब्दांतच विषय संपवला

मुंबईच्या वेशीवर मराठा आरक्षण(Maratha Reservation) आंदोलकांचा जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाची दखल देशभरात घेतली गेली होती. जरांगे पाटील यांच्या या लढ्याला यशही आले होते. स्वतः मुख्यमंत्र्यांनी वाशी येथे मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याचे पत्र जरांगे यांच्या हाती सोपवले होते. परंतु त्यानंतर अंमलबजावणी लांबली, राज्य सरकारने महाराष्ट्रात मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण जाहीर करत वेगळी भूमिका घेतली. तेव्हापासून मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुक संपल्यानंतर म्हणजे चार जून पासून अंतरवाली येथे बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली होती. 

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com