Sanjay Shirsat News : मला मंत्रीपद मिळू नये यासाठी अनेकांचे प्रयत्न, आताही ते टिकेल की नाही ? हे शिंदे-फडणवीस ठरवतील!

Sanjay Shirsat: Many Tried to Block My Minister Post, Now Shinde and Fadnavis Will Decide : सामाजिक न्याय खात्याचा मंत्री झाल्यानंतर आपण अनेक चांगले निर्णय घेतले. जे खाते कोणाला माहित नव्हते त्या खात्याला आपल्या कामातून आणि समाजोपयोगी निर्णयातून ओळख निर्माण करून दिली.
Sanjay Shirsat On ministerial Post News
Sanjay Shirsat On ministerial Post NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : मी चारवेळा विधानसभेवर निवडून आलो. जेव्हा जेव्हा माझे नाव मंत्रीपदासाठी चर्चेत यायचे तेव्हा माझ्या विरोधात षडयंत्र, खोट्या गोष्टी पसरवल्या जायच्या. यावेळीही मला मंत्रीपद मिळणार तेव्हा त्याच्या काही दिवस आधी एक व्हाट्सअप पोस्ट व्हायरल केली गेली. ती कोणी केली हे मला माहित आहे, पण त्यामुळे मला कारण नसताना स्पष्टीकरण द्यावे लागले, त्रास सहन करावा लागला. एकनाथ शिंदे यांनी मला त्याबद्दल विचारले, पण जेव्हा हे सगळं खोटं आणि चुकीचं आहे हे त्यांना कळाले तेव्हा माझ्या मंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला, अशी कबुली सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.

सामाजिक न्याय खात्याचा मंत्री झाल्यानंतर आपण अनेक चांगले निर्णय घेतले. जे खाते कोणाला माहित नव्हते त्या खात्याला आपल्या कामातून आणि समाजोपयोगी निर्णयातून ओळख निर्माण करून दिली, असा दावाही संजय शिरसाट यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून केला. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संजय शिरसाट यांच्यासह महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आठ मंत्र्यांचे पद जाणार असा दावा केला आहे. यावर बोलताना संजय शिरसाट यांनी त्यांनी आता मंत्रालयाबाहेर पोपट घेऊन बसावे आणि नवा धंदा सुरू करावा, असा टोला लगावला.

बेडरूममधील व्हायरल झालेल्या व्हिडिओपासून व्हाट्सअप चॅटिंग व बदनामीच्या अनेक प्रकरणांचा उल्लेख संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला. सामाजिक न्याय खात्याचा निधी दुसरीकडे वळवल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर पुरवणी मागण्यांमध्ये आपलेल्या साडेतीन हजार कोटी मिळाल्याचे शिरसाट म्हणाले. मी गप्प बसणारा माणूस नाही, म्हणून बोललो त्याचा चांगला परिणाम आता दिसू लागला आहे. समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी चांगले होस्टेल, तिथे सगळ्या सुविधा मिळाव्यात यासाठी मी निधी देतो आहे.

Sanjay Shirsat On ministerial Post News
Sanjay Shirsat On Ambadas Danve : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत हे अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरेंना सांगावे! संजय शिरसाट यांचा टोला

आमदारांनाही माझे सांगणे आहे, रस्ते व इतर गोष्टींसाठी निधी न मागता मुलांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी पैसे मागा, त्या कामामुळे तुम्हाला मतदारसंघात ओळख मिळेल. वामनदादा कर्डक, अण्णाभाऊ साठे यांच्यासह अनेक दुर्लक्षित व्यक्तीच्या स्मारकांसाठी मी काम करतो आहे. सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून पदभार हाती घेतल्यानंतर मी अनेक वसतीगृहांना अचानक भेटी दिल्या होत्या. आज तिथे झाल्या सुधारणा तुम्ही जाऊन पहा, असे आवाहन करतानाच या विभागामध्ये काम करण्यास भरपूर वाव आहे, थेट जनतेशी संपर्क येणारे हे खाते आहे, त्यात काम करताना समाधान लाभत असल्याचे संजय शिरसाट म्हणाले.

Sanjay Shirsat On ministerial Post News
Sanjay Raut: फडणवीसाचं सरकार कॅरेक्टरलेस! एक मंत्री रमी खेळतो, एक मंत्री डान्सबार चालवतो...

मी खरा, तर तो खोटा संजय..

संजय राऊत यांना काही काम उरलले नाही, म्हणून ते इतरांचे भविष्य सांगत फिरत आहेत. मला मंत्रीपद मिळणार तेव्हापासून माझ्या विरोधात षडयंत्र, खोट्या गोष्टी पसरवण्याचे काम सुरू आहे. महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात माझ्या समावेशाची चर्चा सुरू झाली, यादी तयार झाली त्याचवेळी माझ्या नावाचे दोन पानाचे व्हाॅट्सअप चॅटिंग व्हायरल केले गेले. ते कोणी केले? मला माहित आहे, पण त्याचे नाव सांगणार नाही. ते व्हायरल झाल्यानंतर मला एकनाथ शिंदे साहेबांनी बोलावून घतले. ते म्हणाले, हे असे असेल तर तुम्हाला मंत्री कसं करणार? सरकारची बदनामी होईल. त्यावर मी स्पष्टीकरण दिले, त्यामागचा खोटारडेपणा, षडयंत्र याची माहिती दिली.

Sanjay Shirsat On ministerial Post News
Sanjay Raut Honey Trap Controversy : हनी ट्रॅपमध्ये चार मंत्र्यांमध्ये भाजपचे दोन, 16 ते 17 आमदार, चार खासदार यातून दिल्लीच्या गळाला; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

शिंदे साहेबांनी त्यांच्या पद्धतीने त्याची शहानिशा केली आणि हा सगळा प्रकार खोटा असल्याचे त्यांनाही लक्षात आले आणि मग माझ्या मंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मी गेलो, उद्या दुसऱ्या कोणी त्यांना हे सांगण्यापेक्षा मीच सगळा प्रकार त्यांच्या कानावर घातला. तेव्हा त्यांनी शिरसाट हे फक्त तुमच्या एकट्याच्याच बाबतीत घडतयं असं नाही, काही काळजी करू नका, असे सांगत मला दिलासा दिला, असेही संजय शिरसाट यांनी सांगितले. आता माझे मंत्रीपद जाणार की राहणार? याची चिंता मी करत नाही. कारण मी चुकीचे वागलेलोच नाही. राहिला प्रश्न मंत्रीपदाचा तर त्याचा निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे घेतील, याचा पुनरुच्चार शिरसाट यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com