Maratha reservation : काळे झेंडे अन् जोरदार घोषणांनी धाराशिव हादरले! एकनाथ शिंदेंच्या लाडक्या मंत्र्यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला; पोलीस यंत्रणा धास्तावली!

Maratha reservation protest News : धाराशिवमध्ये काळे झेंडे अन् जोरदार घोषणा देत मराठा आंदोलकांनी एकनाथ शिंदेंच्या लाडक्या मंत्र्यांचा ताफा अडवला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस यंत्रणा धास्तावली आहे.
Manoj Jarange targets Eknath Shinde
Manoj Jarange targets Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : अंतरवाली सराटीमध्ये गेल्या 13 दिवसापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. गेल्या काही दिवसापासून मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी करत पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. त्यातच आता धाराशिवमध्ये काळे झेंडे अन् जोरदार घोषणा देत मराठा आंदोलकांनी एकनाथ शिंदेंच्या लाडक्या मंत्र्यांचा ताफा अडवला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस यंत्रणा धास्तावली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात एकेरी भाषा सहन केली जाणार नाही, असा इशारा राज्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी मनोज जरांगे यांना दिला होता. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील मराठा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. शुक्रवारी धाराशिवहून परंड्याकडे जात असताना मराठा कार्यकर्त्यांनी योगेश कदमांचा ताफा काळे झेंडे दाखवत अडवला. यावेळी मराठा समाजाच्या (Maratha Reservation) कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यापूर्वीच मराठा बांधवानी एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या विरोधात एकेरी भाषा सहन केली जाणार नाही, असा इशारा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांना दिला होता. त्यानंतर योगेश कदम शुक्रवारी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी मराठा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. धाराशिवहून परंड्याकडे जात असताना मराठा कार्यकर्त्यांनी योगेश कदमांचा ताफा अडवत काळे झेंडे दाखवले आणि जोरदार घोषणाबाजी केली.

Manoj Jarange targets Eknath Shinde
Maharashtra Political Live Update : मोठी बातमी: मुंबई पोलिसांनी मुंबईतील ओबीसी समाजाच्या आंदोलनाला परवानगी नाकारली

धाराशिवहून परंड्याकडे जाणाऱ्या मार्गावर या अचानक घडलेल्या प्रकारामुळे काहीकाळ वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी मराठा कार्यकर्त्याची समजूत काढत पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्वरित मार्ग मोकळा करून दिला. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

Manoj Jarange targets Eknath Shinde
Manoj Jarange Patil : ...तर दहा मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा, मुंबईचा 'प्लॅन' सांगतानाच जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना 'अलर्ट'ही केलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com