Chandrakant Patil : महाविकास आघाडीला फटकारलं, अन् आंबेडकर यांचं चंद्रकांत पाटलांनी कौतुक केलं

Appreciation of Prakash Ambedkar by Chandrakant Patil : मराठा आरक्षणावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी अभ्यासाची भूमिका मांडताना महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना फटकारले. याचवेळी प्रकाश आंबेडकर यांचे कौतुक देखील केले.
Chandrakant Patil
Chandrakant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणावर अभ्यासाची आणि संयमची भूमिका मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला लागू केलेले आरक्षण महाविकास आघाडीला टिकवता आले नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार मराठा आरक्षणावर स्पष्ट भूमिका मांडत नाही. ती मांडली पाहिजे, असे सांगून प्रकाश आंबेडकरांनी सर्व पक्षीय बैठकीत सर्वांकडून लेखी घ्या, अशी चांगली भूमिका घेतल्याचे कौतुक भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा (Maratha reservation) तिढा वाढतच चालला आहे. विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होईल, असे चित्र आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून आरक्षणावर सावध भूमिका मांडली जात आहे. भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणावर संयमाची भूमिका मांडताना महाविकास आघाडीला मात्र फटकारले. आरक्षणाचा इतिहास सांगताना 1967 पासून ओबीसी आरक्षणाची सुरवात झाली. ज्यांना मागास ठवरलं गेलं, त्यांना घटनात्मक आरक्षण दिले गेले. परंतु आता सरसकट आरक्षणाची मागणी होत असून, ती घटनाबाह्य आहे. आर्थिक मागास प्रवर्गाला 10 टक्के एससीबीसी दिले, ज्यांना जातीय आरक्षण आहे, त्यांना एससीबीसी आरक्षण दिले जात नाही, असे चंदक्रांत पाटील यांनी सांगितले.

Chandrakant Patil
Vijay Wadettiwar Vs Devendra Fadnavis : टक्केवारीत पुढे-पुढे, महायुती सरकारला 'त्यांचा' शाप; वडेट्टीवार यांचा फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा लढा मनापासून असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मात्र पुढे आर्थिक मागास आरक्षण गेल्याने मराठा समाजानं कुऱ्हाड मारून घेतली. मराठा, ब्राह्मण, लिंगायत 10 टक्के आरक्षणातून बाहेर पडले. आरक्षणाचा अभ्यास करायचा ठरल्यास, तो शाहू महाराजांच्या काळापासून सुरू असलेले आरक्षण याचा विचार केला पाहिजे. देशात पितृसत्ताक पद्धतीने आरक्षण मिळते. त्यामुळे मातृसत्ताक पद्धतीने आरक्षणाची मागणी कोर्टाने अनेकदा फेटाळल्याकडे भाजप (BJP) नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष वेधले.

Chandrakant Patil
Manoj Jarange patil : "नितेश राणेंनी माझा नाद करू नये, अन्यथा...", जरांगे-पाटलांची वॉर्निंग

13 टक्के आरक्षणात एसी आणि 7 टक्के एसटी जातीच्या आधारावर अ-ब-क-ड वर्गवारी करावी, सुप्रीम कोर्टाने सांगितलय. त्याप्रमाणे पुढे ओबीसीमध्ये अ-ब-क-ड विभाग होतील, असे देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. प्रकाश आंबेडकर यांनी सर्व पक्षीय बैठकीत आरक्षणाबाबत चांगली भूमिका घेतली. सर्वांकडून लेखी घेतले पाहिजे. अशावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आरक्षणावरची भूमिका अधिक स्पष्ट केली पाहिजे. विरोधी पक्षात फक्त बाळासाहेब बोलतात, इतर कुणी बोलायला तयार नाही. उध्दव ठाकरे पळकुटेपणा करतायत, असा टोला लगावत टक्का वाढून काय होणार? मराठ आरक्षण द्यायचे की नाही ते ठरवले पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com