Beed News : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण देण्याच्या मागणीचे अंतरवाली सराटीतून आंदोलन पुकारणान्या मनोज जरांगे पाटील यांना सुरुवातीपासून जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.सुरुवातीच्या उपोषणावेळीही गेवराई व माजलगाव तालुक्यातील गोदाकाठच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत होते.
आता पुन्हा एकदा मराठा समाजाची भक्कम मोट बांधत आरक्षणासाठीचा लढा आणखी तीव्र करतानाच अंतरवाली सराटी ते मुंबई पदयात्रा काढली आहे. याच पदयात्रेचं बीड जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात आले. तर जरांगेंच्या मायभूमीत तर पुन्हा एकदा दिवाळीचे वातावरण आहे.
दोन महिन्यांपूर्वी सर्वात मोठा वार्षिक सण दिवाळीला जी लगबग होती. तीच लगबग आणि उत्साह शनिवारी (ता. 20) मनोज जरांगे पाटील यांचे मुळगाव मातोरीत पाहायला मिळाली.घरांसमोर महिलांकडून सडा टाकून रांगोळी काढल्या जात होत्या. तर, सायंकाळी सुरु झालेल्या जेवणाच्या पंगती उशिरापर्यंत सुरु होत्या.(Maratha Reservation)
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण देण्याच्या मागणीचे अंतरवाली सराटीतून आंदोलनाची पुढील दिशा ठरविणारी अंतिम इशारा सभा जिल्ह्यात झाली. जरांगे यांनी 20 तारखेपासून मुंबईला उपोषणाची घोषणा केली. दरम्यान, 6 दिवसांच्या या पदयात्रा मार्गातील पहिला मुक्काम त्यांचे मुळगाव मातोरीत होता.रात्री आठ वाजता मातोरीत पोचणारी यात्रा पहाटे पोचेल असा अंदाज आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
परंतु,गावकऱ्यांमध्ये व स्वयंसेवकांमध्ये तोच उत्साह आणि तीच लगबग ग्रामस्थांमध्ये होती. मागील चार दिवसांपासून या ठिकाणी मुक्कामी येणाऱ्या आंदोलकांच्या जेवण, राहण्याची व्यवस्था केली जात होती. चार ठिकाणी जेवणासाठी खास मंडप लावला होता. मातोरीकरांच्या स्वागतला आष्टी, पाटोदा, शिरूरसह पाथर्डी, शेवगाव, गेवराई या ठिकाणच्या समाज बांधवांनी जेवणच्या व्यवस्थेचा हातभार लावला. भूमिपुत्र मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईवारीच्या निमित्ताने बीड जिल्ह्याच्या हद्दीत गेवराईपासून या यात्रेच्या महामार्गावरील मार्गावर जागोजागी स्वागत कमानी होत्या. तसेच महिलांकडून औक्षण केले जात होते.
सोशल मीडियावर सध्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केलेले विविध जुगाड पहायला मिळतात.त्याच पद्धतीने मराठा समाज बांधवांनी जुगाड करुन ट्रॅक्टर, पिकअप, टेम्पोला दोन मजले केले.एका मजल्यावर स्वत: आणि दुसऱ्या मजल्यावर स्वयंपाकासाठी गॅस, शेगडी, पातेलं, पळी, तेल, मीठ, पीठ, चटणी, लोणचे असे साहित्य सोबत घेतले. झोपताना आतरून व पांघरून घेत मुंबईकडे कूच केले आहे. (Maratha )
तर ट्रकमध्ये पिण्याच्या पाण्यासह सांडपाणी, स्वयंपाक बनवण्याचे सर्व साहित्य,कपडे लकते व ट्रॅक्टरमध्येच झोपण्याची व्यवस्था करत मराठा बांधव मुबंईकडे निघाले आहेत.काही वाहनांतून भजन - कीर्तन करत समाज बांधव यात्रेत सहभागी झाले आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.