Maratha Reservation : आता कुठलाही प्रयोग करू नका; जरांगेंचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा

Maratha Reservation In Maharashtra Manoj Jarange Patil Sabha Parbhani : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची परभणीत सभा झाली...
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Latest News : राज्यात काही ठिकाणी मराठा समाजातील नागरिकांना नोटीस दिल्या जात आहेत. शासनाला असे वाटत आहे की, नोटीस देऊन आंदोलन दडपून टाकू. पण तसे होणार नाही. शासनाने यापूर्वी केलेल्या प्रयोगामुळे काय झाले हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे यापुढे असा कोणताही प्रयोग शासनाने करू नये, असा गर्भित इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : 'आरक्षणाच्या विरोधात बोलला तर वाजवीलच' ; जरांगेंचा भुजबळांना शेलक्या शब्दात इशारा!

परभणी जिल्ह्यातील सेलू येथे शुक्रवारी जरांगे पाटील यांची सभा झाली. मराठा आरक्षण आपल्या टप्प्यात आले आहे. या निर्णायक लढाईत सर्वसामान्य समाजबांधवांनी आपल्या पाठीशी भक्कम अशी साथ उभी केली. त्याचाच तो परिणाम आहे. या संघर्षात काही व्यक्ती आडव्यासुद्धा आल्या. वेळप्रसंगी त्या व्यक्तींची निश्‍चितच नावे जाहीर करू. जो आड येईल त्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

करोडोंच्या संख्येने मराठे एकत्र आले, ही लाट आता साधीसुधी नाही. नोटीसीला घाबरून ही लाट मागे फिरणार नाही. धमक्यांना घाबरत नाही. आम्ही धमक्या देत नसतो. लोकशाहीप्रमाणे लढा सुरू आहे. ही सभा नाही, मराठ्यांची वेदना आहे. आरक्षणाची 80 टक्के लढाई आपण जिंकलो आहोत समाजबांधवांच्या जीवावरच, साथीवरच, प्रेमावरच ही लढाई लढली जात आहे. समाजबांधवांनी सुद्धा या निर्णायक लढाईत आता मैदानावर उतरले पाहिजे. आता हटायची वेळ नाही, हे आरक्षण कसे देत नाही ते बघतोच, नोटिसीला आपण घाबरत नाही. आरक्षण घेतल्याशिवाय राहत नाही. मराठा समाजबांधवांनी सावध रहावे. एकजूट रहावे, अशी संधी पुन्हा येणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

edited by sachin fulpagare

Manoj Jarange Patil
Manoj Jarange: ...ही सभा नसून मराठ्यांच्या पोरांची वेदना ; जरांगे सरकारवर बरसले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com