मनोज जरांगे-पाटील यांचं अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर हे प्रकरण काल (14 फेब्रुवारी) मुंबई हायकोर्टात गेलं होतं. त्यावर हायकोर्टाने महत्त्वाची टिप्पणी करत जरांगे-पाटलांना सवाल केला आहे.
सरकारकडून उपचार करून घेणार का, असा सवाल काल न्यायाधीशांनी विचारला होता. तसेच यावर गुरुवारी उत्तर द्यावे, असेही सांगितले होते. त्यावर मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) आज सुनावणी झाली आहे.
त्याप्रमाणे जरांगे-पाटलांना (Manoj Jarange Patil) उपचार करून घेण्यात अडचण काय, असा सवाल हायकोर्टाने केला. त्याचवेळी जरांगेच्या उपचारासाठी दोन डॉक्टर उपोषणस्थळी असल्याची माहिती जरांगेच्या वकिलांनी दिली. त्यावर जरांगे-पाटील डॉक्टरांच्या उपचारांना सहकार्य करत नसल्याची माहिती महाधिवक्त्यांनी दिली. त्यावर डॉक्टर उपस्थित असणे म्हणजे औषधोपचार नव्हेत, असे हायकोर्टाने स्पष्ट केले. एवढेच नाही तर तुम्ही भारताचे नागरिक आहात म्हणून राज्य सरकार तुमची काळजी घेत आहे. त्याला तुमचा विरोध का? असा सवालही हायकोर्टाने जरांगे-पाटलांना केला. त्याचवेळी रक्त तपासणी करायची असेल तर मात्र त्यासाठी जरांगेंची परवानगी घ्यावी लागेल, असेही कोर्टाने स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, मनोज जरांगे-पाटील उपचाराला सहकार्य करत नाही आणि फ्लुईडव्यतिरिक्त ते कुठलेही औषधोपचार घेत नाहीत, अशी तक्रार महाधिवक्त्यांनी केली. त्यावर जरांगेंच्या उपचारासाछी दोन डॉक्टर घटनास्थळी (Antarwali Sarati) असून, जरांगेंनी काल दोन सलाइनच्या माध्यमातून फ्लुईड घेतल्याची माहिती जरांगेंच्या वकिलांनी दिली.
मनोज जरांगे-पाटील यांचं अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावली आहे. आज सकाळपासून ते पोटदुखीने विव्हळत आहेत. त्यांची प्रकृतीही खालावत आहे. शिवाय पोटदुखीनेही ते त्रस्त झाले आहेत. तसा त्यांचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे.
राज्य सरकारने 27 जानेवारीला 'सगेसोयरे' (Sagesoyare) या शब्दाचा समावेश करून अधिसूचना काढली होती. आणि त्यावर हरकती मागवल्या आहेत. मात्र, सरकारने आता या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जरांगे-पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. यामुळे सरकारवरील दबाव वाढला असून, सरकारने 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावले आहे.
(Edited by Avinash Chandane)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.