Jalna News : मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे ही आमची मागणी असून मराठा समाज हा ओबीसीमधूनच आरक्षण घेणार, असा पुनरूच्चार मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला. कोणीही कितीही हजार पटीने एकत्रित आले, तरी मराठे आरक्षण ओबीसीतूनच घेणार असे जरांगे म्हणाले.
मराठा समाजाने मागणी केल्याप्रमाणे त्यांना आरक्षण देण्याचा शब्द राज्य सरकारने दिलेला आहे. एका महिन्याच्या आत 13 जुलैपूर्वी याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिलेले आहे. त्यानंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले आपले उपोषण मागे घेतले आहे.
पुढील आठवड्यात मुंबईट होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार याबाबत अंतिम अध्यादेश काढण्याची शक्यता आहे. मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली भुमिका मांडली. ओबीसीमधूनच मराठा आरक्षण घेणार, अशी परखड भुमिका देखील यावेळी त्यांनी मांडली.
इतर मागासवर्गीय आरक्षणाच्या (ओबीसी) संरक्षणासाठी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी जालना येथील वडीगोद्री येथे उपोषण सुरू केले आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण संपविण्याचा डाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने घातला असल्याचा आरोप करत हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असे म्हणत हाके यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांचा मंगळवारी उपोषणाचा सहावा दिवस आहे. यावर मनोज जरांगे यांना विचारले असता ते म्हणाले, ते हजार पटीने एकत्रित आले तरी आरक्षण मराठे ओबीसीतूनच घेणार, असा टोला त्यांनी लगावला. मराठा समाज आता जागा झाला आहे. आता जीवाची बाजी लावून लढायला हवे, असेही जरांगे पाटील म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्व आमदारांनी (MLA) मराठ्यांच्या पाठीमागे उभे रहायला पाहिजे. निवडणुकीत आम्ही सर्व आमदारांनाही मतदान करत असतो. याची जाण ठेवत अधिवेशात हा प्रश्न निकाली काढा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. मराठा नेत्यांनी याकडे गांर्भीयाने न पाहिल्यास विधानसभेत एकालाही मदत करणार नाही. इतकेच नाही तर तुमचे दारात येण्याचे बंद करू असा इशाराच त्यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.