Marathwada Graduate Constituency : महायुतीचे जमले, महाविकास आघाडीत मात्र बिघाडी; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील मैदानात कायम!

Political News : भाजपाने एम. के. देशमुख यांना माघार घ्यायला लावून युतीमध्ये होणारी संभाव्य फाटाफूट टाळल्याने त्यांची बाजू अधिक भक्कम झाल्याचे चित्र आहे.
Pune MVA Seat Sharing Final: MNS to Get Seat from Thackeray Sena Quota
Pune MVA Seat Sharing Final: MNS to Get Seat from Thackeray Sena QuotaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mahavikas Aghadi : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत बंडाचे निशाण फडकले होते. सतीश चव्हाण यांच्याविरोधात भाजपाचे बंडखोर एम. के. देशमुख यांनी तर महाविकास आघाडीतील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दिलीप घुगे यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे डाॅ. प्रतापसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शुक्रवारी माघारीच्या मुदतीत महायुतीला एम. के. देशमुख यांचे बंड शांत करण्यात यश आले.

महाविकास आघाडीत मात्र बंडखोरी कायम राहिली. प्रतापसिंह पाटील यांनी अर्ज कायम ठेवल्याने आघाडीतील मत विभाजनाचा थेट फायदा महायुतीच्या सतीश चव्हाण यांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाने एम. के. देशमुख यांना माघार घ्यायला लावून युतीमध्ये होणारी संभाव्य फाटाफूट टाळल्याने त्यांची बाजू अधिक भक्कम झाल्याचे चित्र आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीप घुगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील हे दोघेही मैदानात कायम आहेत. त्यामुळे आघाडीतील दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांविरोधात लढणार हे आता स्पष्ट झाले आहे.

Pune MVA Seat Sharing Final: MNS to Get Seat from Thackeray Sena Quota
Shivsena News: जे उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात घडलं, तेच एकनाथ शिंदेंकडूनही सुरू...; माजी खासदाराच्या दाव्यानं शिवसेनेत उडवली खळबळ

मराठवाडा पदवीधरसाठी ४१ उमेदवार रिंगणात

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी एकूण ६२ उमेदवारांनी ९२ अर्ज दाखल केले होते. चाचणीत बाद झालेल्या उमेदवारांनंतर ५४ उमेदवार रिंगणात होते. शुक्रवारी माघारीच्या मुदतीनंतर तेरा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूकीत आता रिंगणात ४१ उमेदवार आहेत. यात ३३ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

Pune MVA Seat Sharing Final: MNS to Get Seat from Thackeray Sena Quota
Sharad Koli Arrest : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या पक्षातील बड्या नेत्याला अटक, थेट येरवडा तुरुंगात रवानगी

२३ ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानासाठी ८४२ केंद्र असणार आहेत. तर ३ लाख २६ हजार ७०१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २७ रोजी मतमोजणी छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसीतील कलाग्राम येथे होणार आहे. मतमोजणीसाठी ३४५ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगीतले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com