Marathwadad Graduate Election: मराठवाडा पदवीधरमध्ये धक्कादायक ट्रेंड, युतीच्या सतीश चव्हाणांची धाकधूक वाढली, प्रतापसिंह पाटील आघाडीवर

Mahayui VS Mahavikas Aaghadi : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याच्या शक्यता आहे. महायुतीचे सतीश चव्हाण हे विजयी चौकार ठोकणार असे वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डाॅ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेत महायुतीला धक्का दिला आहे.
Marathwada Graduate Constituency Election
Marathwada Graduate Constituency ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mahavikas Aghadi V/S Mahayuti : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याच्या शक्यता आहे. महायुतीचे सतीश चव्हाण हे विजयी चौकार ठोकणार असे वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डाॅ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेत महायुतीला धक्का दिला आहे. पोस्टल मतदानामध्ये सतीश चव्हाण यांनी २८ मतांची आघाडी घेतली होती. वैध ४९४ पैकी १८७ मते चव्हाण यांना तर १५९ मते ही प्रतापसिंह पाटील यांना मिळाली. पोस्टलमध्येच चव्हाण विरुद्ध पाटील यांच्यात काँटे की टक्कर होणार याचा अंदाज आला होता.

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतपेटीतील पहिल्या पसंतीच्या मत मोजणीसाठी ७० हजारांच्या प्रत्येकी दोन तर उर्वरित ५१ हजारांची तिसरी फेरी असे नियोजन करण्यात आले होते. पहिल्या फेरीतील ७० हजार मतांची मोजणी पूर्ण झाली असून पहिल्या फेरीत प्रतापसिंह पाटील यांना ३०,१०० (४३ टक्के) मते मिळाली. ते ८,४०० मतांनी आघाडीवर होते. सतीश चव्हाण यांना २१,७०० ( ३१ टक्के) रविराज साबळे ८०५० (११ टक्के), दिलीप घुगे ३२९० (४.७) टक्के मते मिळाली. पहिल्या फेरीत ५६७० म्हणजेच ८.१ टक्के मते अवैध ठरली.

गेल्या तीन टर्म म्हणजेच अठरा वर्ष मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर अधिराज्य गाजवलेल्या सतीश चव्हाण आणि राज्यातील महायुतीला हा सुरवातीचा धक्का मानला जात आहे. अद्याप १ लाख २१ हजार ६८९ मतांची मोजणी शिल्लक आहे. या मतमोजणीत निकाल फिरू शकतो, असा अंदाज सतीश चव्हाण समर्थकांकडून वर्तवला जात आहे.

प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. सुरुवातीला विभागातील आठ जिल्ह्यांतील ८४२ मतदान केंद्रांवरील मतपेट्या उघडून त्यातील मतपत्रिकेचे २५ प्रमाणे गट्ठे करण्यात आले.

त्यानंतर या सर्व मतपत्रिकांची सरमिसळ करण्यात आली. या प्रक्रियेला दुपारचे ४ वाजले. त्यानंतर ७० टेबलांवर मतपत्रिकांची मोजणी सुरू झाली. प्रत्येक मतपत्रिका उमेदवारांच्या प्रतिनिधींना दाखवून ती उमेदवारांचे नाव असलेल्या डब्यात टाकण्यात येत होती. मतपत्रिकेचा भलामोठा आकार आणि प्रत्येक मत दाखवून त्याची खात्री करावी लागत असल्याने प्रक्रिया फारच धिम्या पद्धतीने सुरू होती.

Marathwada Graduate Constituency Election
MLC Election Result : काँग्रेसला मोठा धक्का; विद्यमान आमदाराचा पराभव, पाचवेळा निवडून गेले होते विधानपरिषदेत

५० हजार मतांची मोजणी पूर्ण होण्यासाठी सायंकाळचे साडेपाच वाजले. या ५० हजार मतांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे उमेदवार प्रतापसिंग पाटील हे पाच हजार मतांनी आघाडीवर होते. जशी जशी मतांची मोजणी वाढू लागली तशी प्रतापसिंग पाटील यांच्या मतांची आघाडीही वाढू लागली. सायंकाळी साडेसात वाजता ७० हजार मतांजी मोजणी पूर्ण झाली.

त्यावेळी प्रतापसिंह पाटील हे साडेआठ हजार मतांनी आघाडीवर होते.एकूण १ लाख ९१ हजार ६८९ मतांपैकी १ लाख ७८ हजार मते वैध ठरु शकतात. पहिल्या फेरीच्या मतमोजणीनुसार कोटा पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे कोटा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागतील. सर्वात कमी मते घेणाऱ्या उमेदवारांपासून दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागणार आहे.

Marathwada Graduate Constituency Election
Political News: महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीस अन् ठाकरे बंधू एकाच मंचावर...? कारणही आलं समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com