Mumbai News : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या पाच जागांचे निकाल लवकरच हाती येणार आहे. या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच राज्याच्या राजकारणातून मोठी अपडेट समोर येत आहे. मतचोरी, एसआयआर प्रक्रिया, कर्जत वृक्षतोड यांसारख्या विविध मुद्द्यांनी उद्धव व राज या ठाकरे बंधूंसह विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधक आणि ठाकरे बंधूंकडून मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे. अशातच मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी मुख्यमंत्री,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील तीन दिग्गज नेते एकाच मंचावर एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. आरोप-प्रत्यारोप,टीका टिप्पणी यांनी राजकारणाचा स्तर ढासळत असताना फडणवीस-राज ठाकरे-उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर दिसणं महत्त्वाची घडामोड ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या हास्यरेषा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त हे तीन नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. कार्यक्रमाच्या पुत्रिकेतही तिघांची नावं आहे. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात हा कार्यक्रम येत्या 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला राहणार आहे.
प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या महाराष्ट्राच्या हास्यरेषा या पुस्तकाच्या माध्यमातून 1880 पासूनचा मराठी व्यंगचित्र कलेचा प्रदीर्घ वारसा समोर आणला आहे.त्याचमुळे राजकारणापलीकडील मैत्रीचे धागे जपत फडणवीस आणि ठाकरे बंधू हे दिग्गज नेते एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एकत्र येणार असल्याचं समोर येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राज्याच्या राजकारणातील तीन प्रमुख राजकीय व्यक्ती एकाच व्यासपीठावर दिसण्याची शक्यता असल्यानं या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
काही दिवसांपूर्वीच शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजप, मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला होता. ठाकरे पिता-पुत्र हे विविध मुद्द्यांवरुन सातत्यानं भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक हल्ले चढवत आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनीही गेल्या काही महिन्यांपासून फडणवीस यांच्यावर टीकेच्या तोफ डागताना दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.