Marathwada NCP News : शरद पवारांना मराठवाड्यात शून्यापासून सुरुवात करावी लागणार..!

Sharad Pawar's new beginning : निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी नाव आणि घड्याळ चिन्ह केले बहाल.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Marathwada NCP News : शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी अन् राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार हे गेल्या कित्येक वर्षांचे समीकरण अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील बंडानंतर बदलले आहे. शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीत फुट पडली आणि उद्धव ठाकरे, शरद पवारांकडून पक्ष, चिन्ह हिसकावले गेले. उद्धव ठाकरे यांनी वर्षभरात नव्याने पक्षाची बांधणी केले, महाराष्ट्रासह मराठवाड्यात त्यांना जनतेची सहानुभूतीही मिळत आहे.

याच जोरावरच ठाकरे राज्यात पुन्हा शिवसेनेची सत्ता आणि मुख्यमंत्री करण्याचे दावे करत आहेत. अजित पवारांनी सहा महिन्यापूर्वी 35 आमदारांसह राष्ट्रवादीत बंड पुकारले आणि ते सत्तेत जाऊन बसले. शिवसेनेप्रमाणेच निवडणूक आयोगाने काल अजित पवार गटाला राष्ट्रवादी नाव आणि घड्याळ हे चिन्ह बहाल करत आगामी लोकसभा निवडणूक अधिकृत चिन्हावर लढण्याचा मार्ग मोकळा करून दिला.

Sharad Pawar
NCP Crisis : आमदार, खासदारांनी साथ सोडली, पक्ष अन् चिन्हही गेलं; आता नगरसेवकांनीही पाठ फिरवली

शिवसेनेच्या विरोधात आयोगाने जेव्हा निकाल दिला, तेव्हा त्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते. परंतु राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांनाच मिळणार, याचा अंदाज आल्याने कालच्या निर्णयाने धक्का वगैरे काही बसला नाही, असे शरद पवार यांनी सांगून टाकले. एवढेच नाही तर मी राष्ट्रवादी हे नाव आणि उगवता सूर्य हे चिन्ह घेत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी पवारांनी दर्शवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राजकारणात अनुभवचा मोठा फरक आहे. त्यामुळे ठाकरेंना या परिस्थितीतून सावरण्याला वेळ लागला, शरद पवार यांनी मात्र सगळ्या शक्यता गृहित धरून मनाची तयारी केली होती. राष्ट्रवादीचा एक चतुर्थांश भाग अजित पवार यांच्याकडे गेल्यामुळे शरद पवारांना राज्यात आणि मराठवाड्यात शून्यापासून सुरवात करावी लागणार आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील आठ पैकी राजेश टोपे, संदीप क्षीरसगार वगळता सहा विधानसभेचे आणि मराठवाडा, शिक्षक मतदारसंघाचे अनुक्रमे सतीश चव्हाण, विक्रम काळे असे आठ आमदार हे आज अजित पवारासोबत आहेत. पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांनी मराठवाड्याचा दौरा केला तेव्हा त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला होता.

आता पक्ष, चिन्ह आणि आमदारही त्यांच्यासोबत नाही, त्यामुळे मराठवाड्यात नव्याने आपल्या विचारांची माणसं गोळा करत नवी राष्ट्रवादी उभी करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. विधानसभा निवडणुकीला आठ - नऊ महिन्यांचा कालावधी असला तरी लोकसभेची परीक्षा मात्र तोंडावर आहे. कमीवेळात संपुर्ण राज्याचे दौरे करत राष्ट्रवादी पुन्हा उभी करण्यासाठी पवार पुन्हा मैदानात उतरणार यात शंकाच नाही.

मराठवाड्यात आजघडीला शरद पवार यांच्यासोबत परभणी लोकसभा मतदासंघातील घनसावंगीचे विद्यमान आमदार राजेश टोपे, बीडचे संदीप क्षीरसागर हे दोनच लोकप्रतिनिधी आहेत. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजबे व संदीप क्षीरसागर या चौघांपैकी क्षीरसागर शरद पवारांसोबत कायम आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमतचे एकमेव आमदार चंद्रकांत नवघरे हेही अजित पवारांसोबत आहेत.

तर लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे बाबासाहेब पाटील, उदगीरचे संजय बनसोडे सत्तेतल्या राष्ट्रवादीसोबत आहेत. तर नांदेड, धाराशिव, संभाजीनगर जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादीची पाटी कोरी आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर काही पदाधिकारी जे तळ्यात मळ्यातच्या भूमिकेत होते, तेही अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी शरद पवारांना सामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावरच पुढील राजकीय वाटचाल करावी लागणार आहे.

(Edited by Amol Sutar)

Sharad Pawar
Ganpat Gaikwad Firing : गोळीबार प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याला अटक, दोघेजण फरार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com