Uddhav Thackeray Konkan Tour : उद्धव ठाकरे यांच्या रडारवर आज कोण ?

Attention to the Meeting at Chiplun : चिपळूण येथील सभेकडे लक्ष. कितीही सभा झाल्या तरी महायुतीचे उमेदवार निवडून येणार असल्याचा टोला उदय सामंत यांनी लगावला होता.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Ratnagiri News : उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार सभा झाल्या आहेत. या सभांमधून ठाकरे यांनी राणे व केसरकर यांना टीकेचे लक्ष केलं होतं. दोन महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात त्यांनी पालकमंत्री उदय सामंत त्यांना टीकेचे लक्ष केलं होतं. आज सोमवारी संध्याकाळी चिपळूण येथे होणाऱ्या सभेत ठाकरे यांच्या रडारवर आज कोण असणार व ते काय बोलणार, याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. (Uddhav Thackeray Konkan tour)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कितीही सभा झाल्या तरी महायुतीचे उमेदवार निवडून येणार आहेत, असेही उदय सामंत यांनी म्हटलं आहे. या टीकेला आज ठाकरे प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. त्यांच्या रायगड, कोकण दौऱ्यात भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टीकेच लक्ष राहिले आहेत. राज्यात झालेल्या भूकंपानंतर स्थापन झालेल्या शिवसेना - भाजपा युतीमध्ये पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम हे सहभागी झाले.

Uddhav Thackeray
Ravikant Tupkar: प्रसंगी तुरुंगातून लोकसभा निवडणूक लढणार; पण घाबरणार नाही

त्यानंतर राज्यात अजित दादांनी केलेल्या दुसऱ्या राजकीय भूकंपात चिपळूणचे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम हे अजितदादांच्या राष्ट्रवादी गटात सहभागी झाले. शेखर निकम यांना शह देण्याची तयारी खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांना त्यांनी नुकतंच राष्ट्रवादीत घेतलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीचे चिपळूण येथील संभाव्य उमेदवार प्रशांत यादव यांनीही उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती जहरी टीका केली होती. ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी शिवसेनेतील सगळ्या जुन्या नेत्यांना संपवलं, असा आरोप रामदास कदम यांनी केला होता.

महाविकासकडून लोकसभेचे विद्यमान खासदार विनायक राऊत हे पुन्हा उमेदवार असतील हे जाहीर झालं आहे. मात्र अजून महायुतीकडून उमेदवाराचे नाव निश्चित झालेलं नाही. यावरूनही आमदार वैभव नाईक यांनी टीका केली होती. तेव्हा आजच्या रत्नागिरी दौऱ्यात ठाकरे यांच्या टीकेचे कोणते मुद्दे असणार व ठाकरे काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे.

(Edited by Amol Sutar)

Uddhav Thackeray
Bharat Gogawale News : 'ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात...', भरत गोगावले यांचा गौप्यस्फोट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com