Shrikant Shinde : 'आम्हाला पातळी सोडण्यास भाग पाडू नका' ; श्रीकांत शिंदेंचा ठाकरे गटाला इशारा!

Shrikant Shinde On Thackeray Group : काही लोक ज्या आघाडीमध्ये गेले, ते आघाडीची भाषा बोलायला लागले आहेत. असंही श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.
shrikant shinde
shrikant shindesarkarnama

Loksabha Election 2024 : 'आमच्याकडेही शिव्यांची खूप मोठी डिक्शनरी आहे. परंतु आमच्यावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि आई - वडिलांचे संस्कार आहेत. म्हणून आम्ही पातळी सोडत नाही. आम्ही टीकेला कामातून उत्तर देत असतो. त्यामुळे विरोधकांनी आम्हाला पातळी सोडण्यास भाग पाडू नये.', असा इशारा शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटला दिला.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाण्यात राज ठाकरेंच्या आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत श्रीकांत शिंदे बोलत होते.

गेल्या दहा वर्षात मतदारसंघासाठी हजारो कोटींचा निधी आणला आहे. शहरांचा चेहरा बदलत चालला आहे. येणाऱ्या काळात या शहराचा चेहरा अजून बदलेल आणि ही शहरे मुंबईसारखी विकसित होतील, असा विश्वास श्रीकांत शिंदे(shrikant shinde) यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

shrikant shinde
Kalyan Loksabha : 'लढण्याची वेळ तेव्हा पळून गेले', श्रीकांत शिंदेंनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली

याचबरोबर काही लोक ज्या आघाडीमध्ये गेले. ते आघाडीची भाषा बोलायला लागले आहेत. आज पराभव डोळ्यासमोर दिसल्यानंतर गलिच्छ भाषा राजकारणात आणण्याचे काम काही लोकांनी केले. महाराष्ट्राने अशी कधी भाषा पाहिली नव्हती. इतक्या खालच्या स्तरावर राजकारण आणून ठेवले. सकाळपासून ते रात्रीपर्यंत शिव्या शाप देण्याचे काम करत असल्याची टीका डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.

काही लोक ठाणे, कल्याण Kalyan Loksabha  मधून निवडणूक लढण्याच्या वलग्ना करत होते. पण वेळ आली तेव्हा पळून गेले. "तू लढो हम कपडा संभालते है", अशी त्यांची वृत्ती असल्याचा टोला लगावत ठाणे आणि कल्याणमधून महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

shrikant shinde
Raj Thackeray News : श्रीकांत शिंदेंचा फेव्हिकोल जोड अन् राज ठाकरेंचे टोले; ठाण्याच्या सभेत काय घडले?

कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आदित्य ठाकरे किंवा वरूण सरदेसाई लढतील, अशी चर्चा होती. मात्र, वैशाली दरेकर Vaishali Darekar यांनी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून निवडूण रिंगणात उतरवण्यात आले त्यावरून श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लढण्याची वेळ आली तेव्हा पळून गेले, अशी खिल्ली उडवली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com