Kalyan Loksabha Election : पंतप्रधान मोदींनी केले श्रीकांत शिंदेंचे कौतुक; काय आहे कारण...?

Narendra Modi सभेत श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी मतदारांना केले.
PM Narendra Modi, Dr. Shrikant Shinde
PM Narendra Modi, Dr. Shrikant Shindesarkarnama

Kalyan News : कल्याण येथील व्हर्टेक्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी जाहीर सभा झाली. ही सभा कल्याण आणि भिवंडी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ झाली. यावेळी मोदींनी या दोघांनाही निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आज (गुरुवारी) पंतप्रधान मोदी यांनी पत्र पाठवत खासदार श्रीकांत शिंदे यांनी मतदारसंघात केलेल्या कामाबद्दल त्यांच्यावर कौतुकाची थापही टाकली आहे.

कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाविजय संकल्प सभा झाली. येथील व्हर्टेक्स मैदानावर सभा झाली. सभेच्या दुसऱ्याच दिवशी आज (गुरुवारी) पंतप्रधान मोदी यांनी श्रीकांत शिंदे यांना पत्र पाठवत त्यांचे कौतुक केले.

कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदेंनी केलेल्या कामाबद्दल त्यांच्यावर कौतुकाची थापही टाकली आहे. मोदींनी पत्रात म्हटले की, आपण दिवंगत बाळासाहेब ठाकरे तसेच वडील एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रेरणा घेऊन समाजसेवेचा विडा उचलला आहे. त्यामध्ये झोकून देऊन काम केले आहे. मागील दशकात विविध संसदीय समितीवर आपण यशस्वीरित्या काम करुन आपले योगदान दिले आहे.

PM Narendra Modi, Dr. Shrikant Shinde
Kalyan Kale News : 'मी थंड हवेच्या ठिकाणी नाही तर कार्यकर्त्यांमध्ये रमतो' ; कल्याण काळेंचा टोला!

तसेच कल्याण मतदारसंघात चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न केले. तसेच विविध आरोग्य तपासणी शिबिरांच्या माध्यमातून मोफत सुविधा उपलब्ध करुन सर्वसामान्य लोकांना त्याचा लाभ मिळवून दिला. तसेच मतदारसंघात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रयत्न केले.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

नवीन उड्डाण पुलांच्या माध्यमातून कल्याण शहरातील वाहतूकीचा प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे तुम्हाला कल्याणचे लोक पुन्हा लोकसभेत पाठवतील. एनडीएच्या सर्व उमेदवारांचा विजय माझ्यासाठी महत्वाचा आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Edited By : Umesh Bambare

Modis Letter to Shrikant Shinde
Modis Letter to Shrikant Shindesarkarnama

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com