Marathwada Drought: मराठवाड्यातील प्रकल्प कोरडे ठाक, ऐन पावसाळ्यात अडीचशे टँकर धावतायेत

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाडा दौऱ्यावर होते. लातूर, धाराशिव आणि विदर्भातील काही भागांचा दौर करत त्यांनी पावसाअभावी करपलेल्या पिकांची पाहणी केली.
Marathwada Drought
Marathwada DroughtSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाडा दौऱ्यावर होते. लातूर, धाराशिव आणि विदर्भातील काही भागांचा दौर करत त्यांनी पावसाअभावी करपलेल्या पिकांची पाहणी केली. मदतीसाठी टाहो फोडणाऱ्या शेतकऱ्याला जवळ घेत मुख्यमंत्र्यांनी सरसकट मदतीचं आश्वासनही दिले. मराठवाड्यातील भीषण टंचाई पाहता विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिलेली माहिती देखील संभाव्य संकटाची दाहकता सांगणारी आहे.

मराठवाड्यातील प्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत, जनावरांना प्यायला पाणी, खायला चारा नाही. ऐन पावसाळ्यात मराठवाड्याच्या विविध भागात अडीचशे टँकर धावत आहेत. जलसाठे पिण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मराठवाड्यातील या संपूर्ण दुष्काळी परिस्थितीचा अहवाल लवकरच सरकारला पाठवला जाणार आहे.

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिलेल्या माहितीनूसार मराठवाड्यात यंदा सरासरीच्या तुलनेत तब्बल ३५ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाड्यासमोर मोठे संकट ओढावणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणांमधील उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक ५० टक्के पावसाची तूट ही लातूर जिल्ह्यात आहे. त्यापाठोपाठ धाराशिव आणि बीड जिल्ह्यांमध्ये ४० टक्के, तर परभणीत ४३ टक्के पावसाची तूट आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत काही प्रमाणात पाऊस पडला असला, तरी तिथेही २६ टक्के तूट कायम आहे.

Marathwada Drought
Nitish Kumar News: मोठी बातमी! नितीश कुमार यांनी CM पदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर पहिला डाव टाकला,भाजपला हादरा; नव्या पक्षासोबत युतीची घोषणा

पावसाअभावी पाणीटंचाई निर्माण झाल्याने ऐन पावसाळ्यात मराठवाड्यात २४६ टँकर्स सुरू आहेत. सर्वाधिक १२० टँकर्स बीड, ९६ टँकर्स छत्रपती संभाजीनगर आणि २२ टँकर्स जालन्यात सुरू असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगीतले.

धरणं कोरडी, बंधारे बंद

मराठवाड्यातील ९१७ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठ्याच्या तुलनेत ५० टक्के तूट आहे. जायकवाडी धरणात काही प्रमाणात साठा असला, तरी मांजरा धरणात अवघा १० टक्के पाणीसाठा उरल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. नद्यांमधील वाहते पाणी अडवण्यासाठी दरवर्षी सप्टेंबरमध्ये बंद केले जाणारे बंधारे यंदा जुलै-ऑगस्ट महिन्यातच बंद करण्यात आले आहेत.

Marathwada Drought
Disha Salian case : दिशा सालियानच्या वडिलांनी दिलेल्या 500 कोटींच्या नोटिशीला आदित्य ठाकरेंचे 26 पानांचे सडेतोड उत्तर; नेमके काय म्हणाले?

मराठवाड्यामध्य सरासरी वार्षिक पर्जन्यमानमध्ये एकंदरीत ३५% तूट आहे. त्यापैकी सर्वात जास्त लातूरमध्ये ५०% आहे. आज रोजी ४०% धाराशिवमध्ये, बीड ४०% तर परभणीमध्ये ४३% तूट आहे. संभाजीनगर, जालनामध्ये पाऊस पडलेला असला तरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये २६% तूट नोंदवण्यात आली आहे.

अहवाल पाठवणार

मराठवाड्यात मोठे, मध्यम, लघु प्रकल्प आणि नदीवरील बंधारे असे ९१७ बंधारे आहेत. त्यापैकी अनेक प्रकल्पांमध्ये अपेक्षित असलेल्या पाणीसाठ्यात ५०% तूट आहे. आणि जे मोठे प्रकल्प आहेत त्यात जायकवाडी हे जरी भरलेले असले तरी मांजरा आणि इतर धरणामधील परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे, टंचाई आराखडा प्रशासनाने तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

अशी परिस्थिती ओढावणार याची पूर्वकल्पना शासनाने दिली होती. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठकी झाली आणि आमच्या स्तरावरूनही सूचना केली होती. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी या सर्वांना नियमितपणे प्रत्यक्ष स्थळ पाहणी करणे, तालुका कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी बांधावर जाऊन करणे, दुष्काळाची सद्य परिस्थिती काय आहे, पिकाची परिस्थिती काय आहे? ते अंदाज घेणे आणि त्या अनुषंगाने शासनाला एक प्राथमिक अहवाल आम्ही पाठवणार आहोत, असेही विभागीय आयुक्तांनी सांगीतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com