Nitish Kumar News: मोठी बातमी! नितीश कुमार यांनी CM पदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर पहिला डाव टाकला,भाजपला हादरा; नव्या पक्षासोबत युतीची घोषणा

Punjab Assembly Election 2027: पुढील वर्षी अर्थात 2027 मध्ये पंजाब विधानसभेच्या निवडणुका होत आहे. संयुक्त जनता दल(जेडीयू)ने या निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे पंजाबमध्ये जेडीयूनं भाजपसोबत युती न करणं टाळलं आहे.
Nitish Kumar, Narendra Modi
Nitish Kumar, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Bihar News: भाजप आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूनं बिहारमध्ये एकहाती सत्ता आणली. मात्र,सत्तास्थापनेनंतर बिहारच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना नितीश कुमारांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री बनला आहे. मात्र, एनडीए सरकारचा घटक पक्ष असलेल्या जेडीयूचे सर्वेसर्वा नितीश कुमारांनी अखेर पहिला डाव टाकतानाच भाजपला पहिला धक्का दिला आहे. नव्या मित्रपक्षासोबत युतीची घोषणा केली आहे.

पुढील वर्षी अर्थात 2027 मध्ये पंजाब विधानसभेच्या निवडणुका होत आहे. संयुक्त जनता दल(जेडीयू)ने या निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे पंजाबमध्ये जेडीयूनं भाजपसोबत युती न करता थेट शिरोमणी अकाली दल श्री आनंदपूर साहिब (एसएडीएसएएस)सोबत युती जाहीर केली आहे.

बिहारमध्ये आरजेडी आणि काँग्रेस पक्षानं नितीश कुमारांना महाआघाडीत येण्याची पुन्हा एकदा ऑफर दिली आहे. भाजप अन् जेडीयू अंतर्गत सुप्त संघर्षाचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेसनं गळ टाकण्यास सुरुवात केली आहे. अशातच वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन जेडीयू आणि भाजपमध्येही अंतर्गत वादाची ठिणगी पडली असल्याचं बोललं जात आहे.

भाजपनं बिहारमध्ये 'समान नागरी कायदा' (UCC) लागू करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. तर जेडीयूनं मात्र या विधेयकाबाबत सावध भूमिका घेतली आहे. हे विधेयक आल्यावर नंतर भूमिका ठरवणार असल्याचं जेडीयूचे नेते सांगत आहेत.

Nitish Kumar, Narendra Modi
NCPI MP news : खासदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा करताच पक्षात मोठी जबाबदारी; NCPIने उचललं महत्वपूर्ण पाऊल

नितीश कुमारांच्या जेडीयू पक्षानं शिरोमणी अकाली दलासोबत युती करत असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर गेले काही दिवस नितीश कुमार हे काहीसे अलिप्तता बाळगून आहे. ही त्यांची शांतता म्हणजे वादळाची चाहूल तर देत नाही ना असंही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

यातच नितीश कुमार यांनी आपला मित्रपक्ष असलेल्या भाजपला पहिला धक्का देत पंजाबमध्ये अकाली शिरोमणी दलाशी हातमिळवणी केली आहे. यानंतर त्यांची पुढची वाटचाल कशी असणार? हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. केंद्र व बिहारमध्ये भाजप अलर्ट मोडवर येणार आहे.

Nitish Kumar, Narendra Modi
NEET Paper Leak: 'नीट' पेपरफुटी प्रकरण: राष्ट्रीय परीक्षा एजन्सीचा मोटेगावकर कुटुंबाला मोठा दणका; मुलगा आदित्यवर दोन वर्षांची बंदी

पंजाब विधानसभा निवडणुकीत जेडीयू आणि शिरोमणी अकाली दल सर्व जागा लढवणार असून भाजप आणि काँग्रेससमोर आता आपसह जेडीयू आणि शिरोमणी अकाली दल युतीचंही तगडं आव्हान असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com