Ajit Gopchede News : मराठवाडा रेल्वे प्रश्नासाठी नांदेडच्या डबल इंजिन खासदारांकडून जोर; अशोक चव्हाण, अजित गोपछेडे दिल्लीत वजन वापरणार!

Marathwada railway issues News : अशोक चव्हाण यांनी रेल्वे प्रश्नी मंत्री अश्विनी वैष्णव यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर आता खासदार अजित गोपछडे यांनी त्यांची भेट घेऊन रेल्वे प्रश्नांना गती देण्यासाठी साकडे घातले.
ajit gopchade, ashok chavan
ajit gopchade, ashok chavanSarkarnama
Published on
Updated on

Nanded Politics News : भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण, डाॅ. अजित गोपछडे यांनी दिल्लीत आपापले वजन वापरून मराठवाडा व नांदेड जिल्ह्यातील रेल्वे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जोर लावला आहे. संसदेच्या अधिवेशन काळात जणू जिल्ह्यातील या दोन नेत्यांमध्ये स्पर्धाच लागली होती. अशोक चव्हाण यांनी रेल्वे प्रश्नी मंत्री अश्विनी वैष्णव यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर आता खासदार अजित गोपछडे यांनी त्यांची भेट घेऊन रेल्वे प्रश्नांना गती देण्यासाठी साकडे घातले.

मराठवाड्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करून ते सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी व्यक्त केला. मराठवाड्यातील विविध रेल्वे प्रश्नांच्या अनुषंगाने त्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे ही यावेळी उपस्थित होते. केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विकास कामे पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केल्याबद्दल खासदार गोपछडे यांनी समाधान व्यक्त केले.

ajit gopchade, ashok chavan
Ashok Chavan : मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; नांदेड-लातूर रेल्वे मार्गाला गती, अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश!

रेल्वे विकासाला गती मिळणार..

नांदेड-पुणे आणि नांदेड-हैदराबाद वंदे भारत ट्रेन तात्काळ सुरू करावी, धर्माबाद रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस व सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्यात यावा. नांदेड-बिदर नवीन रेल्वेमार्गाच्या कामास महाराष्ट्रातील भागात तातडीने सुरुवात करावी. बोधन-बिलोली-नरसी-लातूर रोड (134 किमी) या नवीन रेल्वेमार्गास मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ajit gopchade, ashok chavan
Ashok Chavan : मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; नांदेड-लातूर रेल्वे मार्गाला गती, अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश!

नांदेड-बिदर या रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्र सरकारने कर्नाटक व तेलंगणा राज्य सरकारांशी समन्वय साधून त्यांच्या 50 टक्के खर्चाच्या वाट्याबाबत आवश्यक पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही गोपछडे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली. शिवाय मुदखेड-धर्माबाद (49 किमी) आणि परळी वैजनाथ-लातूर रोड-उदगीर (96 किमी) या रेल्वे मार्गांना हैदराबाद व सिकंदराबाद विभागातून नांदेड रेल्वे विभागात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

ajit gopchade, ashok chavan
Nanded Politics: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात मोठा धमाका, ताकदवान नेता 'या' दिवशी हाती घेणार धनुष्यबाण

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini Vaishnav) यांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिले. या पुढाकारामुळे मराठवाडा, विशेषतः नांदेड परिसरात रेल्वे जाळ्याचा विस्तार आणि प्रवासी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा गोपछडे यांनी व्यक्त केली आहे. नांदेड व मराठवाड्यातील रखडलेल्या रेल्वे प्रश्नावर राज्यसभेतील दोन खासदार दिल्लीत पाठपुरावा घेत असल्याने ते मार्गी लागतील, असे बोलले जात आहे.

ajit gopchade, ashok chavan
Maharashtra Political Live Update : कात्रज राजस सोसायटी ते खडी मशिन चौक रस्त्याच्या रुंदीकरणाला लवकरच सुरुवात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com