Marathwada Shivsena News: शिंदेंच्या शिवसेनेत चाललंय काय ? निधी वाटपात पालकमंत्रीच घालतायेत खोडा

Tanaji Sawant : शिंदे यांनी पालकमंत्री सावंत यांनी मंजूरी दिलेली यादीच रद्द करत दणका दिला.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पद असूनही आमदारांना निधी मिळत नाही, अशी ओरड करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी बंड पुकारले होते. तेव्हा अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांकडे बोट दाखवत ठाकरेंच्या आमदारांनी थेट भाजपशीच हात मिळवणी केली. त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या अनेकांना पालकमंत्री म्हणून जबाबदारीही मिळाली. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या काळात निधी मिळत नाही, ही तक्रार संपेल अशी अपेक्षा होती. परंतु पालकमंत्र्यांकडूनच शिवसैनिकांचा करेक्ट कार्यक्रम करत असल्याचे समोर येत आहे. यापूर्वी परभणी जिल्ह्यात पालकमंत्री तानाजी सावंत यांनीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या यादीला केराची टोपली दाखवल्याचा प्रकार समोर आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde
Bhavana Gawali: शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींना दणका; आयकर विभागाची मोठी कारवाई

याउलट भाजप आणि विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निधीचे वाटप केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनीच केला होता. या संदर्भात थेट तक्रारच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानंतर याची गांभीर्याने दखल घेत शिंदे यांनी पालकमंत्री सावंत यांनी मंजूरी दिलेली यादीच रद्द करत दणका दिला.

ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी तर सावंत यांच्यावर थेट टक्केवारीचाच आरोप केला होता. त्यानंतर आता हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्याचे त्यांच्याच पक्षाचे खासदार हेमंत पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांना मंजूर केलेला निधी रद्द केल्याचा प्रकार समोर आला. आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये या दोघांमध्ये झालेल्या खडाजंगी, शिवीगाळीचे कारण हेच असल्याचे समोर आले आहे.

निधी वाटपात सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा हा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती गांभीर्याने घेतात ? हे पहावे लागणार आहे. लोकसभा निवडणूक अवघ्या चार महिन्यावर आलेली असतांना शिवसेना शिंदे गटातील निधी वाटपावरून सुरु असलेले वाद चव्हाट्यावर येत असल्याने मुख्यमंत्र्यांची मात्र डोकेदुखी वाढणार आहे. शिंदे हे मराठवाडा दौऱ्यावर येण्याआधीच पक्षातील गटबाजी उफाळून येत असल्याने महायुतीसाठी हा धक्का समजला जात आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Eknath Shinde
Eknath khadse: गिरीश महाजनांना आव्हान देत नाथाभाऊंनी फुंकले लोकसभेचे बिगुल !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com