Sugarcane FRP Issue : ऊसतोड बंद आंदोलनाचे लोण मराठवाड्यातही ; एफआरपी पेक्षा अधिकच्या दोनशे रुपयांची मागणी..

Marathwada Latest News : जे कारखाने जास्त भाव जाहीर करतील त्यांनाच ऊस द्यावा.
Marathwada Sugar cane News
Marathwada Sugar cane NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : यंदाच्या गाळप हंगामात मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या एफआरपीपेक्षा दोनशे रुपये प्रति टन जादा देण्याची मागणी शिवसेना शेतकरी नेते तथा ऊस नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य (शिवसेना शिंदे गट) प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे. (Marathwada Sugar cane News) ऊसाला जादा भाव मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन करित आहेत. तर मराठवाड्यात ऊस दर वाढीवरुन येणाऱ्या काळात वातावरण तापण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

Marathwada Sugar cane News
Nanded BJP News : मुखेड बाजार समितीचे कारभारी ठरले..

यंदाच्या गाळप हंगामात ऊसाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली आहे. (Nanded) तर कारखाना प्रशासनाने आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस दुसऱ्या कारखान्यांनी पळून नेऊ नये यासाठी विशेष दक्षता घेत आहेत. (Factory) नांदेड विभागात येणाऱ्या नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या चार जिल्ह्यांतील २९ साखर कारखान्यांना ऊस गाळपाचा परवानगी देण्यात आली आहे.

यात १८ खासगी, ११ सहकारी कारखान्यांच्या समावेश आहे. गतवर्षीच्या उसाला मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी अधिक दोनशे रुपये द्यावेत, अशी मागणी ऊसदर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे. (Marathwada) अन्यथा ऊसतोड बंद आंदोलन करण्यातबाबत लवकरच सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गतवर्षीच्या उसाला एफआरपी अधिक चारशे रुपये मिळावे या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली गावोगावी ऊसतोड बंद आंदोलन सुरू आहे. मराठवाड्यातही उसाचा मोठा तुटवडा असून कारखान्यांना उसाची कमतरता जाणवत असल्याने ऊस पळवापळवी होत आहे. मात्र ऊस दराबाबत कारखाने आपली भूमिका जाहीर करत नाहीत. अनेक साखर कारखान्यांनी गतवर्षी केवळ एफआरपी रक्कम देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली. त्यामुळे मराठवाड्यातही गतवर्षी गाळप झालेल्या उसाचे एफआरपी अधिक किमान दोनशे रुपये तरी शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे, अशी भूमिका ऊसदर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी घेतली आहे.

मराठवाड्यातील साखर कारखान्यांची संख्या पाहता सर्व कारखान्यांना उसाची कमतरता जाणवत आहे. जे कारखाने जास्त भाव जाहीर करतील त्यांनाच ऊस द्यावा. भाऊराव, पूर्णा, बळीराजा, विलासराव देशमुख ग्रुप, नॅचरल शुगर यासह अनेक साखर कारखान्यांचे बाय प्रोडक्ट (उपपदार्थ )उत्पादन आहे. त्यामुळे गतवर्षी गाळप केलेल्या उसाचे एफआरपी प्लस दोनशे रुपये सर्व कारखान्यांनी द्यावेत, अन्यथा ऊसतोड बंद आंदोलन करण्याबाबत मराठवाड्यातील शेतकरी संघटना,सामाजिक संघटना, चळवळीतील शेतकरी नेते, शेतकरी आघाड्या यांची लवकरच एक सर्वपक्षीय बैठक घेऊन सगळ्यांच्या विचाराने एकत्रित आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे इंगोले यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com