Marathwada Graduate Constituency : पक्षाची इज्जत वाचवायची असेल तर विक्रम काळे माघार घ्या..

NCP News: सातत्याने तुम्हीच उमेदवार आणि आमदार तर मग आम्ही काय संतरंज्या उचलायच्या का?
Marathwada Teacher Constituency News, Aurangabad
Marathwada Teacher Constituency News, AurangabadSarkarnama

Pradip Solunke : मराठावाडा शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी व महाविकस आघाडीने चौथ्यांदा उमेदवारी दिलेले विक्रम काळे यांच्याविरोधात बंडखोरी झाली. (Ncp) राष्ट्रवादी वक्ता सेलचे अध्यक्ष प्रदीप सोळुंके यांनी विक्रम काळे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असतांना सोळुंके यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विक्रम काळे यांनाच माघार घेण्याचे आवाहन केले.

Marathwada Teacher Constituency News, Aurangabad
Prakash Ambedkar News : भाजपकडून विखे पाटील तर काॅंग्रेस थोरातांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणणार..

राष्ट्रवादी (Ncp) आणि आघाडीतील शिवसेना-काॅंग्रेस या तीनही पक्षांची इज्जत वाचवायची असेल तर माघार घ्या, आणि मला पाठिंबा जाहीर करा, असे आवाहन सोळुंके यांनी केले. (Teacher) शिवाय त्यानंतर सोळुंके नाॅटरिचेबल झाल्याने ते माघार घेणार की मग पक्षाविरुद्ध बंड करणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या काही तास आधी आपल्या फेसबुकपेजवरून एक व्हिडिओ व्हायरल करत प्रदीप सोळुंके म्हणाले, माझ्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी तुमचे काम करून तुम्हाला मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून तीनवेळा निवडून दिले. पण तुम्ही आमच्याकडे ढुंकून देखील पाहत नाही, मग तुम्ही शिक्षकांचे प्रश्न काय सोडवणार. पक्षाने तुम्हा तिसऱ्यांदा उमेदवारी दिलीच कशी? हा खरा प्रश्न माझ्यासह इतरांना देखील पडला आहे.

चौथ्यांदा उमेदवारी घेतांना तुम्हीच नकार द्यायला हवा होता, सातत्याने तुम्हीच उमेदवार आणि आमदार तर मग आम्ही काय संतरंज्या उचलायच्या का? आता आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी बाप्पा तुम्ही माघार घेतली पाहिजे. पक्षाची इज्जत वाचवायची असेल तर माघार घ्या, आणि मला पाठिंबा जाहीर करा, असे आवाहन देखील सोळुंके यांनी केले आहे.

तुम्हाला मंत्री व्हायचे आहे, मग आम्हाला आमदार होण्याची इच्छा झाली तर काय चुकले? तुम्हाला उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघातून संधी आहे, तुमच्या मनातली ती सुप्त इच्छा देखील आहे. तेव्हा विधानसभेचे आमदार व्हा, आम्ही तुमचे काम करू, पण आता माघार घ्या, अशा शब्दात सोळुंके यांनी विक्रम काळे यांनाच उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर ते नाॅटरिचेबल झाल्याने सोळुंके बंडाचा झेंडा फडकवणार? की मग नेत्यांचे ऐकून माघार घेणार हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com