

Chhatrapati Sambhaji Nagar municipal corporation : महापालिका प्रशासनाने नगरसेवक शेख मतीन पटेल यांच्या यांच्या मालमत्तेवर कारवाई ही कायदेशीरपणे केले जाईल, अशी हमी दिल्यानंतरही घाईने 11 मे रोजीच मनपा प्रशासनाने ती मालमत्ता पाडली. मनपाच्या या आतेताई कारवाईसंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. यासंदर्भातील बाबी मांडण्यासाठी दिवाणी अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात न्यायमूर्ती वैशाली पाटील जाधव यांनी दिली आहे.
नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तेवर नियमानुसार कायद्याचे पालन करुन कारवाई करण्याची हमी 12 मे रोजी महापालिका प्रशासनाने न्यायालयात दिली होती. त्यानुसार नोटीसची मुदत संपण्याच्या दिवशी 18 मे रोजी सुनावणी ठेवली होती. परंतु 13 मे रोजी मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मतीन पटेल याचे घर, दुकान व कार्यालय पाडले. निदा खान थांबली ते घरही पाडण्यात आले. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात तीन स्वतंत्र याचिका दाखल आहेत. शुक्रवारी (ता. 15) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने खंडपीठाच्या मनपाच्या कारवाईसंबंधी आश्चर्य व्यक्त केले.
कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील संशयीत आरोपी निदा खानला एआयएमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिल्याचा आरोप आहे. महापालिका प्रशासनाने यासंबंधी मतीन पटेल यांचे राहते घर, दुकान आणि कार्यालय आदी मालमत्तांना 9 मे रोजी नोटीस बजावली होती. सोबतच निदा खान थांबलेल्या प्लॉट नं. 43 ब्रिजवाडी येथील घरालाही नोटीस बजावली होती.
9 मे रोजी शनिवारी नोटीस बजावली व दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने सुटी होती. याचिकाकर्त्यांनी 11 मे रोजी मनपाला पंधरा दिवसांची मुदत मिळावी यासाठी लेखी पत्र दिले. महपालिका प्रशासनाची मालमत्ता पाडण्याची तयारी बघता मतिन पटेल यांनी दोन याचिका दाखल केल्या आणि ब्रिजवाडी येथील मालमत्ताधारक हनिफखान, सय्यदखान व सय्यद सरवर यांनी एक याचिका दाखल केली.
12 मे रोजी तीनही याचिकांवर खंडपीठात सुनावणी झाली. सुनावणी प्रसंगी मनपातर्फे नियमानुसार कायद्याचे पालन करुन कारवाई केली जाईल असे सांगितले. मनपा प्रशासनाने 12 मे रोजी 24 तासांत मालमत्तेमधील साहित्य काढण्याची नोटीस बजावली होती. चोविस तासांची मुदत 13 मे रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत असताना पहाटे पाच वाजता मतीन पटेल व इतर तिघांच्या मालमत्ता पाडण्यात आल्या.
मतीन पटेल यांचे राहते घर, कार्यालय व दुकान पाडले. घर मतीनचे वडील मजित शेख अकबर यांनी 1992 मध्ये रूपचंद दहिहांडे यांच्याकडून रजिस्टर सेल डिडद्वारे खरेदी केले होते. प्रारंभी प्लॉट होता नंतर त्यावर घर बांधले. नियमित कराचा भरणा करतात 2010, 2011 ची कर पावती सोबत जोडलेली आहे. भाऊ मोहसिन याचेही नाव आहे. कार्यालय वडिलांच्या नावावर आहे. असे असताना केवळ मतिन पटेल यांनाच नोटीस बजावल्याची बाब खंडपीठाच्या निदर्शानास आणून दिली.
घरावर फेडरल बॅंकेचे 20 लाखांचे कर्ज पंधरा वर्षांसाठी घेतले आहे. तिसऱ्या याचिकेत हनिफखान, सय्यद सरवर व युसुफखान यांची ब्रिजवाडी येथील प्लॉट नं 43 वरील मालमत्ता 12 मार्च 2026 रोजी आमेरखान अख्तरखान यांच्याकडून खरेदी केली. घरात अद्याप राहायला आलेले नाही, काही काम शिल्लक होते. दरम्यान नगरसेवक मतिन पटेल यांनी नातेवाईक येणार आहेत, त्यांना राहण्यासाठी चावी मागितली. निदा खान यांना राहण्यासाठी त्यांना चावी दिली. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. कृष्णा रोडगे व ॲड. अभयसिंह भोसले यांनी काम पाहिले. प्रकरणाची सुनावणी 18 मे रोजी ठेवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.