Bulldozer Action : महापालिकेचा एमआयएमला झटका! मतीन पटेलचे नगरसेवक पद जाणार? बुलडोझरही चालणार; महापौरांच्या इशाऱ्याने खळबळ

Nida Khan TCS religious Conversion And Exploitation Case : निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून पोलिसांनी अटक करत एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Nida Khan TCS religious Conversion And Exploitation Case; Matin Patel, a corporator from the All India Majlis-e-Ittehadul Muslimeen (AIMIM)
Nida Khan TCS religious Conversion And Exploitation Case; Matin Patel, a corporator from the All India Majlis-e-Ittehadul Muslimeen (AIMIM)sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. निदा खानला एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.

  2. मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या अनधिकृत घरावर बुलडोझर कारवाईची तयारी सुरू आहे.

  3. या प्रकरणामुळे संभाजीनगरात मोठी राजकीय खळबळ उडाली असून नगरसेवक पदही धोक्यात आल्याची चर्चा आहे.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : 'टीसीएस' कंपनीतील जबरदस्तीने धर्मांतर व लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून तीन दिवसापूर्वी अटक झाली. एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याच्या नारेगांव प्रभागातील कैसर पार्क येथील घरातून पोलीसांनी तिला ताब्यात घेतले होते.

या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवक मतीन पटेल याच्या अटकेची व त्यांच्या अनाधिकृत घरावर बुलडोझर फिरवण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. दरम्यान, महापौर समीर राजूरकर यांनी या प्रकरणात मतीन पटेल यांचे नगरसेवक पदही जाऊ शकते, असा इशारा दिला आहे. मतीन पटेल यांनी आपल्या निवडणूक शपथ पत्रात याच घराचा उल्लेख केला नसेल तर निश्चितच त्यांचे नगरसेवक पद जाऊ शकते, असे राजूरकर यांनी स्पष्ट केले.

मतीन पटेल यांच्या कैसर पार्क येथील घरात निदा खान आणि तिचे संपूर्ण कुटुंब गुप्तपणे वास्तव्यास होते. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलीसांनी संयुक्त कारवाईत निदा खानला अटक केली. तीला राहण्यासाठी स्वतःचे घर देऊन मदत करणारे नगरसेवक मतीन पटेल आता चांगलेच अडचणीत आले आहे. ज्या घरात निदा खान राहत होती ते अनधिकृत असल्याचा दावा केला जात आहे. शिवाय त्यावर महापालिका बुलडोझर फिरवण्याची कारवाई करण्याची शक्यता आहे.

Nida Khan TCS religious Conversion And Exploitation Case; Matin Patel, a corporator from the All India Majlis-e-Ittehadul Muslimeen (AIMIM)
Muslim house denial case : मुस्लिम असल्याने घर नाकारलं; धार्मिक भेदभावाचा आरोप, AIMIM शहराध्यक्षांनी ठोकली पोलिसांत तक्रार

यावर महापौर समीर राजूकर यांनी याला दुजोरा देतानाच मतीन पटेल यांचे नगरसेवक पदही धोक्यात असल्याचे स्पष्ट केले. तीन दिवसात मतीन पटेल यांना संबंधित घराची कागदपत्र सादर करायला सांगितली आहेत. मतीन पटेल यांच्या नावावर दोन घरे आहेत, पण ती अनधिकृत असावीत असा, आम्हाला संशय आहे. या संदर्भात महापालिकेने त्या घरावर नोटीस बजावली आहे.

हे घर बांधताना महापालिकेची परवानगी घेतली आहे का? त्याचे खरेदी खत, गुंठेवारी केली गेली आहे का? हे त्यांनी महापालिकेत कागदपत्र सादर केल्यानंतर स्पष्ट होणार आहे. या शिवाय मतीन पेटल यांनी निवडणुक शपथ पत्रात हे घर दाखवले आहे का? की त्याची माहिती लपवली आहे हे सोमवारी स्पष्ट होईल. जर या घराचा उल्लेख त्यात नसेल तर मतीन यांचे महापालिका नियमानूसार नगरसेवक पदही जाऊ शकते, असा इशारा राजूरकर यांनी दिला आहे.

Nida Khan TCS religious Conversion And Exploitation Case; Matin Patel, a corporator from the All India Majlis-e-Ittehadul Muslimeen (AIMIM)
Nida Khan TCS AIMIM SIMI Links : ‘सिमीशी संबंध असलेले लोक 'AIMIM'मध्ये?’ निदा खान धर्मांतर प्रकरण, मंत्री विखेंच्या आरोपांनी राजकीय खळबळ

FAQs :

1. निदा खानला कुठून ताब्यात घेण्यात आले?

निदा खानला छत्रपती संभाजीनगरातील कैसर पार्क परिसरातील मतीन पटेल यांच्या घरातून ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे.

2. मतीन पटेल यांच्यावर कोणती कारवाई झाली आहे?

त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे.

3. बुलडोझर कारवाई का होणार आहे?

निदा खान राहत असलेले घर अनधिकृत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

4. या प्रकरणात राजकीय प्रतिक्रिया काय आहेत?

या प्रकरणावरून एमआयएम आणि इतर पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

5. नगरसेवक पद धोक्यात का आले आहे?

महापौरांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणामुळे मतीन पटेल यांचे नगरसेवक पद धोक्यात येऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com