Ashtikar, Sattar and Bangar Meeting : जब मिल बैठे...आष्टीकर, सत्तार अन् बांगर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Hingoli Political News : 'या' अचानक भेटीने मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या एवढे मात्र निश्चित.
Ashtikar, Sattar and Bangar
Ashtikar, Sattar and BangarSarkarnama

Hingoli Shivsena Politics News : ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार आणि शिंदे गटाचे आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोष बांगर एकाच वेळी एका ठिकाणी एकत्र आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

जब मिल बैठे.. आष्टीकर-सत्तार-बांगर अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. परंतु या भेटीमध्ये कुठलाही राजकीय विषय किंवा चर्चा झाली नाही, पालकमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांना भेटून जिल्ह्यातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी आपण आलो होतो. आमदार बांगर तिथे उपस्थित असल्याने आम्ही हस्तांदोलन केले. त्यांनी मला लोकसभा निवडणुकीच्या विजयाबद्दल शुभेच्छा देत अभिनंदन केले. यापेक्षा वेगळे काही आमच्यामध्ये घडले नाही, असे सांगत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी या भेटीवरून तर्क लढवणाऱ्यांना शांत केले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर(Nagesh Patil Ashtikar) हे लाखाच्या मताधिक्याने विजयी झाले. महायुतीचे बाबुराव कदम यांचा त्यांनी पराभव केला.

Ashtikar, Sattar and Bangar
Shivsena UBT : ठाकरेंच्या एकनिष्ठ आमदारासमोर मतदारसंघ राखण्याचे आव्हान!

लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची खासदार आष्टीकर यांनी काही दिवसांपुर्वी मुंबईत भेट घेतल्याची माहिती आहे. आष्टीकर त्यांना भेटण्यासाठी गेले तेव्हा तिथे आमदार संतोष बांगर(Santosh Bangar) आधीच उपस्थितीत होते. ` क्या बाॅस` म्हणत बांगर यांनी आष्टीकरांशी हस्तांदोलन करत विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बैठकीत तिघांशिवाय दुसरे कोणी उपस्थितीत नव्हते. मात्र या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले जाते.

Ashtikar, Sattar and Bangar
Shivsena and Vaijapur Vidhan Sabha : लोकसभेला भुमरेंना मताधिक्य, तरीही शिवसेनेसाठी सोपी नसणार वैजापूर विधानसभेची निवडणूक!

या भेटी संदर्भात माहिती घेण्यासाठी खासदार आष्टीकर, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार संतोष बांगर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही. या अचानक भेटीने मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या एवढे मात्र निश्चित. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बाबुराव कदम यांना उमेदवारी देत त्यांच्यासाठी जोर लावला होता.

स्वतः शिंदे यांनी हिंगोलीत दोन सभा घेतल्या होत्या. याशिवाय जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांच्यावरही कदम यांना निवडून आणण्याची जबाबदारी दिली होती. परंतु मराठा आरक्षणाच्या मुद्य्यावरून महायुती सरकारविरोधात असलेल्या रोषाचा थेट फायदा नागेश पाटील आष्टीकर यांना झाला आणि ते लोकसभेवर निवडून गेले.

Ashtikar, Sattar and Bangar
Bhavana Gawali and Hemant Patil : भावना गवळींचे पुनर्वसन, पण मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातर हिंगोलीची जागा सोडणारे हेमंत पाटील वाऱ्यावर?

निवडून आल्यानंतर महिनाभरातच ठाकरे गटाच्या खासदाराने शिंदेंच्या मंत्री आणि आमदाराची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात याची चवीने चर्चा होत आहे. पण या भेटीतून फार काही मोठे राजकीय नाट्य घडेल, अशी शक्यता फारच कमी असल्याचे समजते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com